अन् 'त्या' प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी जोडले हात

Hands joined by Supriya Sule : चंद्रपुरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळेंच्या या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी चर्चा केली. सुळे यांचे जोरगेवार समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

Hands joined by Supriya Sule
अन् 'त्या' प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी जोडले हात  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुप्रिया सुळे या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत
  • सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचीदेखील भेट घेतली
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार – सुप्रिया सुळे

चंद्रपूर : बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सुळे यांनी चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचीदेखील भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर थेट हात जोडावे लागले. पत्रकारांनी सुळे यांना पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्यासंदर्भातील प्रश्नाबरोबरच थेट त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का असा प्रश्न विचारला यावेळी सुप्रिया सुळे यांनी हात जोडत म्हटलं की, २०२४ मध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला एवढीच विनंती करीन की मला बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने तिकीट द्यावं,” असं हात जोडून सुळे म्हणाल्या.

अधिक वाचा : नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाचे मुस्लीम देशांत पडसाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार – सुप्रिया सुळे

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यावेळी सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रश्नावरही उत्तरं दिली. आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळेंनी दिलेल्या भेटीला राज्यातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे महत्त्व असल्याची बोललं जाऊ लागले आहे. चंद्रपुरात दाखल झालेल्या सुप्रिया सुळेंच्या या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी पत्रकारांशी चर्चा केली. सुळे यांचे जोरगेवार समर्थकांच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावली त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व अपक्ष आमदारांची मंगळवारी भेट घेणार असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.

अधिक वाचा : झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर करा फोटो 

तुम्हाला नागरिकशास्त्राची जाण असेल – सुप्रिया सुळे 

दरम्यान, पुढे पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना एका खोचक प्रश्न विचारात म्हटलं की, तुम्ही महिलांना भेटत आहात, त्यांच्यासंदर्भातील कार्यक्रम राबवत आहात. आम्हाला कधी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एक महिला पहायला मिळेल का?, असा प्रश्न पत्रकारांनी सुप्रिया यांना विचारला असता सुप्रिया सुळे यांनी देखील प्रश्नाचे उत्तर देताना म्हटलं की, त्यावर उत्तर देताना सुप्रिया “एक तर मी लोकसभा लढतेय. तुम्हाला नागरिकशास्त्राची जाण असेल. “मी पदासाठी कुठलंही काम आयुष्यात करत नाही. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सेवाभावी काम मी करते. मला खासदारीमध्ये खूप रस आहे त्यामुळे २०२४ साली मी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडे मला पुन्हा एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा तिकीट द्यावं अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा : जीवनात या गोष्टींची लाज बाळगली तर आयुष्यभर होईल पश्चात्ताप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी