धक्कादायक ! किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवल्या थेट तलवारी अन् सुऱ्या

swords and knives for sale in grocery stores : बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत असल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं असल्याच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त समोर आल्या आहेत

swords and knives for sale in grocery stores
किराणा दुकानात विक्रीसाठी ठेवल्या थेट तलवारी अन् सुऱ्या   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं आहे
  • जिल्ह्यात अलीकडच्या काळात अवैध शस्त्र बनविणे , विक्री करणे अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत
  • या परिसरात अनेकदा पोलिसांनी सापळा रचून २० ते २५ हजारात गावठी पिस्तुल विकताना अनेकांना पकडलं आहे

बुलढाणा : पोलिसांनी गुप्त खबऱ्याद्वारे एका किराणा दुकानात धाड टाकली असता त्यांना त्या ठिकाणी घातक शस्त्र तलवारी व सुरे तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा , देशी विदेशी दारू, तसेच तीन तलवारी व एक मोठा सुरा असा मुद्देमाल सापडला आहे. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण ४५ हजार ४८० रुपये किंमत आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ग्राम तिकोडी येथे असणाऱ्या राजू बडे याच्या जगदंबा किराणा दुकान व घरामध्ये धाड टाकली होती. दरम्यान , पोलिसांनी यावेळी एकाला अटक देखील केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे राजू बडे असं आहे. पोलिसांनी राजू बडे  याच्याविरुद्ध नांदुरा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं आहे

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत असल्याचं समोर येत आहे. त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर , जळगाव जामोद परिसरात अवैध शस्त्र विक्रीचं हब बनत चाललं असल्याच्या अनेक तक्रारी देखील प्राप्त समोर आल्या आहेत. मात्र पोलिसांची मोठी कारवाई होत नसल्याने व या अवैध शस्त्र तयार करणे व विकणाऱ्या व्यवसायाला लगाम लागत नाही. यामुळं परिसरात दहशत मात्र वाढत असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात अलीकडच्या काळात अवैध शस्त्र बनविणे , विक्री करणे अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. झारखंड दहशतवाद विरोधी पथकाने तर जिल्ह्यात येऊन कारवाई करत काही गावठी पिस्तुल व शस्त्र जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. 

या परिसरात अनेकदा पोलिसांनी सापळा रचून २० ते २५ हजारात गावठी पिस्तुल विकताना अनेकांना पकडलं आहे

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्याला मध्यप्रदेशची सीमा आहे. या परिसरात अनेकदा पोलिसांनी सापळा रचून २० ते २५ हजारात गावठी पिस्तुल विकताना अनेकांना पकडलं आहे. त्याचबरोबर हा परिसर आदिवासी बहुल असल्याने या परिसरात अवैध शस्त्र मध्यप्रदेशातून तस्करी करून ते विक्री होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्याचे गेल्या वर्षभराच्या पोलीस कारवाईच्या माध्यमातून समोर आलं आहे. दरम्यान आता तर थेट गुन्हेगारांनी सीमा पार करत जिल्ह्यातील किराणा दुकानातच तलवारी, सुरे अशी घातक शस्त्र चक्क विकण्यास विकली जात आहेत. त्यामुळे, पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी