Road Accident ।  बुलढाण्यात भीषण अपघात, ३ ठार १ गंभीर

Road Accident ।  मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

Breaking News
Road Accident ।  मलकापूर जवळ भीषण अपघात, ३ ठार १ गंभीर 
थोडं पण कामाचं
  • मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
  • बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर झाला अपघात
  • मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर वरून धरणगावकडे जात होती प्रवासी ऑटो

मलकापूर :  बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील मलकापूर शहराजवळ कंटेनर ट्रक आणि प्रवाशी ऑटोमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गंभीर जखमीला मलकापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

मुंबई-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर वरून धरणगाव कडे जाणाऱ्या प्रवासी ऑटो क्रमांक एम एच २८ डीजी  २७८४ ला नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रक क्रमांक एन एल ०१ एइ ४५४३ ने समोरून जबर धडक दिली. या अपघातामध्ये ऑटोचा  अक्षरश: चुराडा झाला. 

चालक आणि प्रवाशांमधील एकूण तीन जण ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मृतक हे बुलढाणा शहरातील असल्याचे समजते. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मलकापूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी