नागपूर : गेल्या एका काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या (Crime) घटना मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पहायला मिळत आहेत. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) तर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावली आहे. यातच आता पुन्हा एक धक्कादायक घटना नागपूर येथून समोर आली आहे. स्वतःच्या 14 महिन्यांच्या मुलीला रेल्वेत सोडून अपहरणाचा कट जन्मदात्या बापाने रचला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटनेने नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा ; तुरुंगातून बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक, राऊतांच्या मनात काय
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बापाने स्वतःच्या मुलीच्या अपहरणाचा बनाव रचला होता. कृष्णकुमार राजकुमार कोसले असं आरोपीचे नाव असून त्याने केलेली ही बनवाबनवी पोलीस तपासात उघड झाली आहे. कृष्णकुमार राजकुमार कोसले याने त्याच्या पत्नीचे लक्ष दुसरीकडे विचलित केले आणि आपल्या 14 वर्षाच्या मुलीला जबलपूर-अमरावती एक्सप्रेसमध्ये बसवले. यानंतर आरोपी कृष्णकुमारने त्याच्या पत्नीबरोबर चेन्नई-रायपूर प्रवास केला. त्याने नागपूर रेल्वे स्थानकावर थांबला असता आपल्या अपहरणाचा कट रचला. तशी फिर्याद देखील त्याने पोलिसांकडे दिली असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी आरोपी बापाची कसून विचारपूस केली यावेळी त्याने आपण आपल्या 14 वर्षीय मुलीचा अपहरणाचा कट रचला असल्याचे कबूल केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांकडून मुलीचा शोध सुरू असून, पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा देखील दाखल केला असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक वाचा ; टीम इंडियाने अॅडलेडमध्ये इतका स्कोर करायला हवा होता - द्रविड
नागपूरमध्ये सतत चोरी, दरोडे यांसारख्या घटना घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शांती नगर पोलीस स्टेशन हद्दीत 73 लाख रुपयांची चोरी झाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. व्यसनाधीन असलेल्या एका 28 वर्षीय तरुणानेच ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. जाफर जावेद थारा असं अटकेतील तरुणाचं नाव आहे. तर वाजीद वल्द गफ्फुर अली असे सहकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या दोघांना अटल केली असून, या दोघांची कसून चौकशी पोलीस करत आहेत.
अधिक वाचा ; किरीट सोमय्या रत्नागिरी दौर्यावर, पोलिसांसमोर जबाब नोंदवणार