बापाला धनाची लालसा; गृप्त धनासाठी मुलीचं लैंगिक शोषण नंतर केला बळी देण्याचा प्रयत्न

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 27, 2022 | 19:17 IST

धनाची लालसा माणसाला हैवान बनवून टाकत असते. यवतमाळमध्ये (Yavatmal) घडलेली घटनेनं ते परत एकदा सिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. येथे एका बापानं आधी आपल्या मुलीचे लैंगिक शोषण (sexual abuse) केले आणि नंतर लपवलेला खजिना (Treasure)मिळविण्यासाठी 18 वर्षांच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केला.

yavatmal crime
धनासाठी मुलीचं लैंगिक शोषण नंतर केला बळी देण्याचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातून धक्कादायक घटना आली समोर
  • नराधमाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला
  • आरोपी तांत्रिकासोबत मिळून खजिना मिळवण्यासाठी विधी करत होता

Maharashtra Crime News : यवतमाळ : धनाची लालसा माणसाला हैवान बनवून टाकत असते. यवतमाळमध्ये (Yavatmal) घडलेली घटनेनं ते परत एकदा सिद्ध झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या घटनेनमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. येथे एका बापानं आधी आपल्या मुलीचे लैंगिक शोषण (sexual abuse) केले आणि नंतर लपवलेला खजिना (Treasure)मिळविण्यासाठी 18 वर्षांच्या मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. बाभूळगाव (Babhulgaon) तहसीलमध्ये (Tahsil) सोमवारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पीडितेचे वडील, एक तांत्रिक आणि इतर सात जणांना अटक करण्यात आली आहे.

मुलीचे लैंगिक शोषण

यवतमाळच्या बाबुलराव परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जिथे एका बापानेच आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केले.  आरोपी पित्याला दोन मुली असून मोठ्या मुलीसोबत त्याने असे कृत्य केले. लपलेला खजिना शोधण्यासाठी त्याने आधी मुलीचे लैंगिक शोषण केले आणि नंतर तिला गाडण्याचा प्रयत्न केला. 

मुलीने मित्राला गुपचूप फोटो पाठवले होते

ही मुलगी अभ्यासासाठी एका नातेवाईकाकडे राहायची आणि नुकतीच मदनी गावात तिच्या घरी आली होती. आरोपीने गेल्या काही दिवसांपासून घरी तांत्रिक विधी सुरू केले होते आणि 25 एप्रिल रोजी आपल्या मुलीला पुरण्यासाठी घरात खड्डा खोदला होता. वडिलांनी आधी खड्डा खणला आणि नंतर त्याची पूजा केली. खड्ड्यात फुले व मिठाई अर्पण करण्यात आली. या दरम्यान मुलीने सर्व फोटो काढले.  मुलीने हे सर्व फोटो काढून तिच्या मैत्रिणीला पाठवले. तिच्या मैत्रिणीने सर्व फोटो पोलिसांना पाठवले, त्यानंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी