वाशिम: जिल्ह्यातील कारंजा (Karanja) तालुक्यात एका प्रेमी जोडप्यानं एकमेंकांसोबत आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. धरणात (dam) उडी घेवून या दोघांनी आत्महत्या केली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या केलेली मुलीचं नुकतचं लग्न झालं होतं. अडाण धरणात (Adan Dam) कारंजा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या सदस्यांना बोलावून त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या ठिकाणावरून जवळच पुरुषाचा मृतदेहही तरंगताना आढळून आला. तोही पोलिसांनी बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
कारंजा तालुक्यातील पिंप्री वन परिसरातील अडाण धरणात एक महिला व एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. खुशी लक्ष्मीकांत मेहता व शंकर एकनाथ खिराडे अशी दोघांची नावे आहेत. दोघेही कारंजा शहरातील इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहेत.
Read Also : CWG2022 : सुधीरने पॅरा पॉवरलिफ्टिंग मिळवलं पहिलं सुवर्णपदक
शंकरचे वय अंदाजे २६ वर्षे असून खुशीचे वय अंदाजे २३ वर्षे आहे. दोघांनीही सोबतच आत्महत्या करण्यासाठी धरणात उडी घेतली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत.
Read Also : शकीलचा मेव्हणा सलीम फ्रूटला एनआयएकडून अटक
खुशी आणि शंकर प्रेमी युगल असल्याची परिसरात चर्चा आहे. प्रेमाला घरच्यांचा विरोध होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केली, असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. खुशी विवाहित होती व काही दिवसांपूर्वीच करंजात माहेरी आली होती. शंकरसोबत तिची जुनी ओळख होती. आज दोघे भेटून धरणावर फिरायला गेले व एकमेकांशी लग्न न झाल्याने नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.