अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्याच्यासोबत पूर्वी लग्न जुळले होते, त्याच तरुणीचे अश्लील फोटो काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान , सदर पीडित तरुणीने मुलाच्या विरोधात तक्रार दिली असून तक्रारीनंतर संबंधित युवकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेली एकंदरीत घटना अशी आहे की, चांदूर बाजारला राहणाऱ्या एका युवकासोबत शहरात राहणाऱ्या एका युवतीचे मार्च २०२१ मध्ये शहरातील युवतीचे चांदूर बाजारला राहणाऱ्या युवकासोबत लग्न जमले होते. परंतु काही कारणामुळे युवतीच्या कुटुंबीयांनी थोड्या दिवसानंतर हे लग्न मोडले. लग्न मोडले असताना देखील युवतीचे आणि सदर युवकाचे मोबाइलद्वारे बोलणे सुरु होते. बोलणे सुरु असताना युवकाने पिडीत युवतीला आपण पळून जाऊन लग्न करु, असं म्हणत तू निर्वस्त्र होऊन मला व्हिडिओ कॉल कर, अशी मागणी त्याने पिडीतेकडे केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्या युवकाने युवतीचे अश्लील छायाचित्र तिच्या नातेवाईकांना पाठवून पाच लाख खंडणी न दिल्यास हे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली असून, या प्रकरणी युवतीने नागपूरी गेट पोलिस ठाण्यात तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माझ्यासोबत पळून चल, अन्यथा कपडे न घातलेल्या अवस्थेत व्हिडिओ कॉल कर", अशी मागणी त्याने केली. तसंच आपल्यातील गोष्टी तुझ्या भावाला सांगणार नाही, असंही तो पीडितेला म्हणाला. त्यामुळे पीडित तरुणी त्याच्या म्हणण्यानुसार त्याला व्हिडीओ करायची. त्यावेळी युवकाने व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शॉट द्वारे युवतीचे आक्षेपार्ह फोटो काढून घेतले आणि हे फोटो काही दिवसांनी पीडित महिलेच्या बहिण तसेच काका व काकूंच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आले.
दरम्यान, सदर फोटो आल्यामुळे पीडितेच्या भावाने फोटो पाठवणाऱ्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतला. यावेळी सदर क्रमांक हा एका महिलेचा असल्याचे समोर आले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी पीडितेच्या बहिणीच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला त्यावेळी तुझ्या बहिणीचे आणखी अश्लील फोटो असल्याचे तो म्हणाला. ५ लाखांची खंडणी द्या; अन्यथा सर्व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे पीडिताने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत.