young man Rape Dog: विकृतपणा ! कुत्रीवर अत्याचार; भटक्या कुत्रीला तरुणाने बनवलं आपल्या वासनेचा शिकार

नागपूर
भरत जाधव
Updated Nov 01, 2021 | 20:10 IST

चंद्रपरमध्ये (Chandrapur) एक किळसवाणी घटना घडली आहे. एका तरुणाने एका भटक्या कुत्रीला आपल्या वासनेचा बळी बनवलं आहे.

The young man made the stray dog ​​the victim of his lust
भटक्या कुत्रीला तरुणाने बनवलं आपल्य वासनेचा बळी   |  फोटो सौजन्य: Times Now

चंद्रपूर :  चंद्रपरमध्ये (Chandrapur) एक किळसवाणी घटना घडली आहे. एका तरुणाने एका भटक्या कुत्रीला आपल्या वासनेचा बळी बनवलं आहे. या तरुणाने कुत्रीवर अनैसर्गिक (Unnatural) अत्याचार केले असून याप्रकरणी पोलिसांनी या विकृत तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर शहरातील नागपूर मार्गावरील वाहन शोरुम लगतच्या जागेत ही घटना घडली आहे.

कुत्रीवर अत्याचर करणाऱ्या विकृत तरुणाचे नाव प्रकाश डाफ आहे. या विकृत तरुणाने रस्त्यावर असलेल्या एका कुत्रीवर शोरुमच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेत नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचर केले. हा सगळा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच प्राणीमित्र संघटनेला याची माहिती दिली. संघटनेच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. तसेच या संघटनेनं पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत आरोपी प्रकाश डाफ याला अटक केली आहे. त्याच्यावर कलम ३७७  नुसार रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. २०२० साली मुंबईमध्येही एका वयोवृद्ध विकृताने ३० कुत्र्यांवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी या वृद्धाला अटक केली होती. बॉम्बे अॅनिमल राईट्स या संस्थेच्या विजय मोहनानी यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी