Sonia Gandhi :  नागपुरात युवक काँग्रेसमध्ये 'शिवसेना' संचारली, कार्यकर्त्यांनी पेटवली कार  

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  (Sonia Gandhi)यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नागपुरात  (Nagpur)चारचाकी वाहन जाळले.

The Youth Congress activists on Tuesday set ablaze a four-wheeler in Nagpur
नागपुरात युवक काँग्रेसमध्ये 'शिवसेना' संचारली, कार्यकर्त्यांनी पेटवली कार   
थोडं पण कामाचं
  • काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  (Sonia Gandhi)यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नागपुरात  (Nagpur)चारचाकी वाहन जाळले.
  • नॅशनल हेराल्ड (National Herald )या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गांधींच्या चौकशीच्या दुसऱ्या दिवशी ईडीने त्यांचे जबाब नोंदवले.
  • याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. 

नागपूर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी  (Sonia Gandhi)यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नागपुरात  (Nagpur)चारचाकी वाहन जाळले. नॅशनल हेराल्ड (National Herald )या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गांधींच्या चौकशीच्या दुसऱ्या दिवशी ईडीने त्यांचे जबाब नोंदवले.(The Youth Congress activists on Tuesday set ablaze a four-wheeler in Nagpur)

अधिक वाचा :  का माणसं घोरतात? यापासून कशी मिळवाल मुक्ती

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली वायसी सदस्यांनी अचानक विरोध केल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सुमारे 20 काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

 
Sonia Gandhi : नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेटवली कार Sonia Gandhi : नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पेटवली कार #Congress #SoniaGandhi #nagpur Posted by Times Now Marathi on Tuesday, July 26, 2022

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले आहे. याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून देशभरात कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन सुरू आहे. 

अधिक वाचा :  परफेक्ट फिगरसाठी सेलेब्स खातात 'हा' पदार्थ

नागपुरातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, संतप्त कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात कार पेटवून दिली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोनिया गांधी यांच्यावर ईडीच्या कारवाईच्या विरोधात राज्यव्यापी काँग्रेसच्या निषेधादरम्यान नागपुरात एक वाहन पेटवून देण्यात आले. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली शहरातील जीपीओ चौकात आंदोलन सुरू असताना ही घटना घडली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी