'फडणवीस आणि शिंदेंसारखी ढोंगी लोकं नाहीत', संजय राऊतांची घणाघाती टीका

संभाजीनगर नामकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय जर या सरकारने घेतला असेल तर फडणवीस आणि शिंदे यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत अशी टीका शिवसेना संजय राऊत यांनी केली आहे.

there are no hypocrites like fadnavis and shinde sanjay raut scathing criticism
'फडणवीस,शिंदेंसारखी ढोंगी लोकं नाहीत', राऊतांची घणाघाती टीका 
थोडं पण कामाचं
  • संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर टीका
  • देवेंद्र फडणवीस हेच राज्यकारभार चालवित असल्याचा राऊतांचा दावा
  • फडणवीस आणि शिंदे यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, राऊतांनी थेट केली टीका

नागपूर: 'संभाजीनगर, धाराशीव या नामकरणाच्या निर्णयाला जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोकं नाहीत.' अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  

संजय राऊतांची तुफान टीका 

...तर शिंदे आणि फडणवीसांसारखे ढोंगी लोकं नाहीत! 

'पाच निर्णय जे महाविकास आघाडी सरकारने घेतले होते त्याला स्थगिती दिली किंवा रद्द केले असं मला समजलं. आत्ताच माझं उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही झाली. त्या निर्णयात ठाकरे सरकारने खासकरुन उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं धाराशीव केलं. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला.' 

अधिक वाचा: पुलोद सरकार आणि सध्याच्या सरकारमधील साम्य

'हे तीनही निर्णय फिरवले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे. औरंगाबादचं संभाजीनगर कधी करताय? हा प्रश्न गेल्या काही काळापासून भाजपचे लोकं विचारत होते. उद्धव ठाकरेंनी केंद्राची पर्वा न करता अत्यंत हिंमतीने लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबादचं संभाजीनगर केलं. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोकं नाहीत.' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे.  

'मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही'

'मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. या सरकारला हे निर्णय फिरविण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे.' 

अधिक वाचा: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के सुरूच; १८ नगरसेवक शिंदे गटात

'या निर्णयाने काय साध्य केलं हा प्रश्न तुम्ही उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवा. मुख्यमंत्र्यांना विचारला जावा असं मी म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही.' अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली. 

'सरकारचं डोकं बधिर झालंय'

'एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असा आक्रोश करत आहात आणि दुसऱ्या बाजूला संभाजीनगरच्या निर्णयाला स्थगिती कशाला देताय?' 

'आर्थिक निर्णय मी समजू शकतो. आर्थिक निर्णय समजू शकतो, बुलेट ट्रेनविषयी निर्णय समजू शकतो. आरेचा विषय तुमचा अत्यंत जिव्हाळ्याचा होता. तो मी समजू शकतो. पण औरंगजेब तुमचा अचानक कसा काय नातेवाईक झाला? हा उस्मान कोण लागतो तुमचा निजामाच्या काळातला?,  कोर्टाची टांगती तलवार सरकारवर असल्याने डोकं बधिर झाले आहे. त्यामुळे ते निर्णयांना स्थगिती देत आहे.' अशी टीका करत संजय राऊतांनी शिंदे सरकारचा खरपूस समाचार घेतला.

अधिक वाचा: 'राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजत बसले आहेत काय?'

'शिवसेना सोडून गेलेले निष्ठेबद्दल बोलतायेत...'

'मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असेल असे म्हणायला मी काय मालक आहे का? मी निष्ठावान शिवसैनिक आहे. जर आरोप करणारे निष्ठेबद्दल बोलत असतील तर निष्ठेची व्याख्या बदलावी लागेल. शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करणारे भाजपने आपल्यासोबत नेलेले आहे ते त्यांनाच लखलाभ हो.' 

'ससंदेमध्ये यापुढे काहीच बोलता येणार नाही. तोंड हात-पाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या लावून जावे लागेल. ही आणीबाणीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे.' असंही संजय राऊत यावेळी म्हणाले. 

'खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत'

'कधी चिठ्ठ्या पाठवतात, कधी माईक खेचतात, कधी शर्ट खेचतात, बऱ्याच गंमती-जमती महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहे. त्यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत.' असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी