yashomati Thakur । अमरावती : नवी दिल्ली येथील अमर ज्योत हटवण्याच्या प्रकरणावरून राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज केंद्र सरकारवर सडेतोड टीका केली. देशाचा इतिहास जो मिटवेल त्याला देश मिटविल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दांत ठाकूर यांनी टीकास्त्र सोडले आहे.
अधिक वाचा : सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदार राष्ट्रवादीत
प्रजासत्ताक दिनाच्या दोन तीन दिवस अगोदर नवी दिल्लीतील राजपथावरून अमर जवान ज्योत हटविली, पण इतिहास आपण मिटवू शकत नाही, इतिहास मिटवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना देश मिटवेल, अशी प्रतिक्रिया मंत्री यशोमती ठाकूर यानी आंतरराष्ट्रीय प्रजासत्ताक दिन दिली.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती येथील जिल्हा स्टेडियमवर शासकीय ध्वजारोहण करून समस्त जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
भारत पाकिस्तान युद्धात ज्यांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योती कायम तेवत होती ती हटविण्याचे का मोदी सरकारने केले आहे. त्या अमर हुतात्मांचा अवमान केला असल्याचेही ठाकूर यांनी आरोप केला.
अधिक वाचा : भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी धोक्यात या खेळाडूंचे स्थान
राजपथावर विद्यार्थी असताना मी देखील संचलन केले होते. त्यावेळी त्या ठिकाणाहून जाताना दायने देख म्हणून सॅल्यूट करतो, त्यावेळी देश भक्तीच्या भावना असता त्या उच्चांकावर असतात, त्याच आता नष्ट झाल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.