Sushama Andhare: माझ्या जिवाला धोका, भरसभेत सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट

नागपूर
भरत जाधव
Updated Jan 06, 2023 | 08:31 IST

सुषमा अंधारे सध्या चंद्रपूरमध्ये (chandrapur) एका व्याख्यानात केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहेत. व्याख्यानात बोलताना अंधारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.  त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकारणातील (politics) वातावरण तापणार आहे.  

Threat to my life, Sushma Andhare  says in chandrapur
माझ्या जिवाला धोका, भरसभेत सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या बुलंद तोफ ओळखल्या जातात.
  • ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे.
  • प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

मुंबई : शिवसेनेच्या फायरब्रँड महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare)या त्यांच्या आक्रमक भाषण शैलीमुळे चर्चेत असतात. आपल्या भाषणात ते मोठं-मोठ्या नेत्यांरवर जोरदार टीका करत असतात. अंधारे सध्या  चंद्रपूरमध्ये (chandrapur) एका व्याख्यानात केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहेत. व्याख्यानात बोलताना अंधारे यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.  त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकारणातील (politics) वातावरण तापणार आहे.   (Threat to my life, Sushma Andhare  says in chandrapur)

अधिक वाचा  :निवडणुकांमध्ये पिता - पुत्रांना धडा शिकविण्याचा दिला इशारा

सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या बुलंद तोफ ओळखल्या जातात. मात्र त्यांनी घातपाताची भीती व्यक्त केल्यानं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धारदार शब्दांनी टीका करतात. भाजप विरोधी नेत्यांवर चौकशी यंत्रणा लावून त्यांना धाक दाखवत असते. परंतु या यंत्रणा आपल्या मागे भाजप लावू शकत नाही, यामुळे माझा घात-अपघात होऊ शकतो अशी भीती शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यख्यानात व्यक्त केली आहे. ‘तुमच्या मागे चौकशी लावण्या सारखं काही नसल्याने अपघात घडविला जाऊ शकतो. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. 

अधिक वाचा  : राजमाता जिजाबाई जयंती ( तिथीनुसार) निमित्त खास मराठी Message

चंद्रपूर शहरातील प्रियदर्शिनी सभागृहात सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते. महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे व्याख्यान होते. याच व्याख्यानात सुषमा अंधारे यांनी हा गौप्यस्फोट केला. अंधारेंच्या भाषणात नेहमी भाजप आणि भाजपमधील नेत्यांना लक्ष्य करत असतात. 

भाषणांमुळे सुषमा अंधारे चर्चेत

ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून सुषमा अंधारे यांनी सभांचा धडका लावला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. प्रक्षोभक भाषण प्रकरणी त्यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता.  जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले असल्याचे अंधारे म्हणाल्या होत्या. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी