नागपूर महामार्गावर Burning बसचा थरार; 35 प्रवासी असलेल्या ST ला भीषण आग

St Bus Caught Fire: अमरावती ते नागपूर या मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसने पेट घेतला असून चालकांच्या प्रसंगावधनामुळे 35 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

Thrill of Burning Bus on Nagpur Highway; ST with 35 passengers caught fire
नागपूर महामार्गावर Burning बसचा थरार; 35 प्रवासी असलेल्या ST ला भीषण आग ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी एसटी बसला भीषण आगीच्या दोन घटना
  • पुण्यात येरवडा येथे शिवशाही बसला आग
  • अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरही एसटी बस जळू खाक

अमरावती : अमरावती-नागपुर राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसने घेतला पेट घेतल्याची घटना घडली आहे. महामार्गावरच बसने पेट घेतल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. (Thrill of Burning Bus on Nagpur Highway; ST with 35 passengers caught fire)

अधिक वाचा : Shocking!, दिला नाही मोबाईलच्या Hotspot चा पासवर्ड, गमवावा लागला जीव

नागपूर आगाराची ही एसटी बस होती. अमरावतीवरून ही बस नागपूरच्या दिशेने रवाना झाली होती. नागपुर राष्ट्रीय महामार्गावरून पिंपळविहीर येथे एसटी बसने अचानाक पेट घेतला. दरम्यान, गाडी खराब झाल्याने एसटी बस चालकाने गाडी बाजूला घेऊन उभी केली होती. गाडीतील 35 प्रवाश्यांना खाली उतरवल्यानंतर गाडीने अचानक पेट घेतल्याची माहिती आहे. तर चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाने तासाभरानंतर एसटी बसला लागलेली आग विझविण्यात त्यांना यश आले. पण तोपर्यत बस जळून खाक झाली होती.

अधिक वाचा : Jalna : स्टील कारखान्यात बाॅयलरचा स्फोट; 10 कामगारांचा होरपळून मृत्यू, अनेक गंभीररित्या जखमी

मागच्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये एका खासगी बसला आग लागून जवळपास १२ जणांचा मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी वणी येथे एसटी महामंडळाच्या एका बसला आग लागली होती. सुदैवाने त्या घटनेत जिवितहानी झाली नाही. तर आज पुण्यात आणखी एक आगीची घटना घडली आहे. येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही शिवशाही बस यवतमाळ-औरंगाबाद-पुणे असा प्रवास करत असता तिने अचानक पेट घेतला. शिवाजीनगर बस डेपोकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली. यवतामाळहून निघाल्यापासून ही बस वारंवार गरम होत होती. मात्र तशा अवस्थेत ती पुण्याला आली. सुदैवाने सर्व प्रवासी खराडी येथे उतरले होते

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी