राज्यात तुफान पाऊस, भयंकर पूरस्थिती; शिंदे-फडणवीस एकत्र दौऱ्यावर

राज्यात अनेक ठिकाणी भयंकर पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: एकत्र पाहणीसाठी गडचिरोली दौऱ्यावर गेले आहेत.

torrential rains in state severe flood conditions eknath shinde devendra fadnavis on gadchiroli tour together
भयंकर पूरस्थिती; शिंदे-फडणवीस एकत्र गडचिरोली दौऱ्यावर  |  फोटो सौजन्य: Twitter

गडचिरोली: महाराष्ट्रात मान्सून सर्वदूर पोहचला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन थेट गडरचिरोलीला रवाना झाले. यावेळी दिवसभर मुख्यमंत्री शिंदे यंनी गडचिरोलीमधील विविध पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी केली. 

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणीपातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही या बदलाच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'गडचिरोली पूरग्रस्त परिस्थिती असल्याने त्यांची पाहणी करणार आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून सर्व यंत्रणा अलर्टवर आहेत. जीवित हानी होणार नाही यासाठी आम्ही अलर्ट आहोत, तशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.' 

अधिक वाचा: ४ दिवस मुसळधार पावसाचे; 'या' जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

याशिवाय मालमत्ता आणि जीवितहानी होणार नाही, नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी देखील सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

याशिवाय राज्य आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, लष्कर, एनडीआरएफ या सर्वांशी चर्चा झाली आहे. त्यांना अलर्ट केलं असल्याचं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टी भागात येत्या काही तासात मुसळधार पावसाच्या सरी बरसतील. पुढील ४-५ दिवस कोकण (मुंबई ठाण्यासह), मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पावसाची शक्यता आहे. 

अधिक वाचा: नाशकात मुसळधार पाऊस; गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कुठल्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट 

१२ जुलै

रेड अलर्ट - पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, गडचिरोली

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर

१३ जुलै 

रेड अलर्ट - पालघर, रायगड, नाशिक, पुणे

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर 

अधिक वाचा: 

१४ जुलै 

रेड अलर्ट - पालघर, नाशिक, पुणे 

ऑरेंज अलर्ट - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा 

१५ जुलै 

अधिक वाचा: Car Drowned : रायगडमध्ये तलावात बुडाली कार, सुदैवाने जिवीतहानी नाही, क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली कार

ऑरेंज अलर्ट - पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी