Accident News कार-ट्रकचा भीषण अपघात, मुंबईतील कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी

Heavy collision between car and truck, three killed ; मुंबईतील लिलाधर चोपडे हे आपल्या कुटुंबासह दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावी म्हंणजेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे इकडे जात होते. मात्र, त्यांच्या कारला वाशिमच्या पांगरी गुटे गावानजीक महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली असून, या अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Heavy collision between car and truck, three killed
मुंबईच्या कुटुंबासाठी दिवाळी ठरली काळी, तिघांचा जागीच मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वाशिम जिल्ह्यातील पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला
  • कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात घडला आहे
  • भीषण अपघातात मुंबई येथील तिघांचा मृत्यू

वाशिम : राज्यात अपघाताचे ( Accident ) प्रमाण वाढले असून, गेल्या काही दिवसांमध्ये अपघाती मृत्यूचे प्रमाण देखील वाढल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील पुलगाव-जालना राष्ट्रीय महामार्गावर (Pulagav - Jalna Highway) एक भीषण अपघात घडला असून, या अपघतात तिघांचा मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा पांगरी कुटे जवळ झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात ( Car - Truck Accident ) झाला असून, या अपघातात तीन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. (truck car accident in washim three died and one serious injured )

अधिक वाचा ;  मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

मुंबईतील चोपडे कुटुंब हे दिवाळीनिमित्त वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे जात होते

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लिलाधर चोपडे हे आपल्या कुटुंबासह दिवाळी सण साजरा करण्यासाठी गावी वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे इकडे जात होते. मात्र, त्यांच्या कारला वाशिमच्या पांगरी गुटे गावानजीक महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.अपघात तिघांचा मृत्यू झाला आहे. .

अधिक वाचा ; दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी 

7 वर्षांचा लहान मुलगा लावण्य चोपडे हा गंभीर जखमी

दरम्यान, . कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चालक लिलाधर चोपडे, सोनू चोपडे, आणि 11 वर्षांचा मुलगा हार्दिक चोपडे या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 7 वर्षांचा लहान मुलगा लावण्य चोपडे हा गंभीर जखमी झाला असून, लावण्य चोपडे याच्यावर वाशिमच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रकच्या धडकेत कारचं प्रचंड नुकसान झालं त्यामुळे अपघातग्रस्तांना क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात असून, ऐन दिवाळीत झालेल्या या अपघातामुळे चोपडे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा ; T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटवर कोरोनाचं सावट

अधिक वाचा ; घरबसल्या चेक करु शकता एलआयसी पॉलिसीचं स्टेट्स, जाणून घ्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी