Buldhana : बुलढाण्यात कत्तलीसाठी गायी नेणार्‍या ट्रकला संतप्त जमावाने लावली आग, तणावाचे वातावरण

बुलढाण्यात रात्री एक ट्रक कत्तलींसाठी गायी घेऊन जाताना नागरिकांना दिसला होता. तेव्हा नागरिकांनी त्यातील गायी काढून ट्रक पेटवून दिला. नागरिकांचा संताप पाहता ट्रक चालक आणि साथीदाराने पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

थोडं पण कामाचं
  • बुलढाण्यात रात्री एक ट्रक कत्तलींसाठी गायी घेऊन जाताना नागरिकांना दिसला होता.
  • तेव्हा नागरिकांनी त्यातील गायी काढून ट्रक पेटवून दिला.
  • नागरिकांचा संताप पाहता ट्रक चालक आणि साथीदाराने पळ काढला.

Cow Slaughter : बुलढाणा : बुलढाण्यात रात्री एक ट्रक कत्तलींसाठी गायी घेऊन जाताना नागरिकांना दिसला होता. तेव्हा नागरिकांनी त्यातील गायी काढून ट्रक पेटवून दिला. नागरिकांचा संताप पाहता ट्रक चालक आणि साथीदाराने पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यातील नांदूर तालुक्यात एक ट्रकमध्ये २५ गायी कत्तलींसाठी मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा हा ट्रक बिघडला आणि ट्रकमधील गायींनी हंबरडा फोडण्यास सुरूवात केली होती. तेव्हा स्थानिक नागरिकांनी या ट्रककडे धाव घेतली, तेव्हा २५ गायी या ट्रकमध्ये अक्षरशः कोंबण्यात आल्या होत्या. तेव्हा नागरिकांनी या गायी बाहेर काढल्या. तेव्हा २५ गायींपैकी ८ गायींचा मृत्यू झाला होता. तेव्हा उपस्थित नागरिक चिडले आणि त्यांनी हा रिकामा ट्रक पेटवून दिला. नागरिकांचा संताप पाहून चालक आणि त्याच्या साथीदाराने घटनास्थळाहून पळ काढला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थाळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी