पाकिस्तानात अडकून आहेत २ मुली आणि पत्नी, परत आणण्यासाठी धडपडतोय यवतमाळमधील तरुण

two daughters and wife-stranded in pakistan : मिळालेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर २०१४ रोजी यवतमाळच्या साजिद या तरुणाचा निकाह पाकिस्तान येथील जैनब सयानी या तरुणीशी झाला होता. या दोघांची ओळख इंटरनेटच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर जैनब सयानी ही तरुणी महाराष्ट्रातील तरुणाला भेटण्यासाठी एक महिन्याच्या व्हिसावर भारतात आली होती. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांसाठी व्हिसा वाढवला. मग एलटीव्हीसाठी अर्ज केला होता.

two daughters and wife-stranded in pakistan
पाकिस्तानात अडकून आहेत २ मुली आणि पत्नी, रत आणण्यासाठी धडपड   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आयशा आणि आमना या दोन मुलींसह पत्नी जैनाब सयानी या कराचीत अडकून आहेत
  • इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कराची येथील जैनाबशी महाराष्ट्रातील तरुणाची ओळख झाली होती
  • व्हिसा मुदत बाह्य होत असल्याने साजिदला भारतात परत यावं लागलं.

यवतमाळ : आयशा आणि आमना या दोन मुलींसह पत्नी जैनाब सयानी या कराचीत अडकून आहेत. आपल्या पत्नीला आणि दोन मुलीना घरी आणण्यासाठी पतीची धडपड सुरु आहे. तब्बल ३ वर्षांपूर्वी हे सर्वजण पाकिस्तानच्या कराचीला गेले होते. मात्र, कोरोना काळात लॉकडाऊन लागल्याने हे सर्वजण तिथेच अडकून पडले. मात्र, कोरोनाच्या कठीण काळानंतर देखील आयुष्य रुळावर आले असे नाही. कारण, कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यानंतर साजिद सयानी आपल्या पत्नीला आणि दोन मुलींना भारतात आणण्यासाठी धडपड करत आहे. यासाठी त्याने सर्व कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. 

अधिक वाचा : बेरोजगारीचा काळ दाखवणारं मोदी सरकार देणार 10 लाख नोकऱ्या

इंटरनेटच्या माध्यमातून पाकिस्तानच्या कराची येथील जैनाबशी महाराष्ट्रातील तरुणाची ओळख झाली होती

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार १९ ऑक्टोबर २०१४ रोजी यवतमाळच्या साजिद या तरुणाचा निकाह पाकिस्तान येथील जैनब सयानी या तरुणीशी झाला होता. या दोघांची ओळख इंटरनेटच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर जैनब सयानी ही तरुणी महाराष्ट्रातील तरुणाला भेटण्यासाठी एक महिन्याच्या व्हिसावर भारतात आली होती. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांसाठी व्हिसा वाढवला. मग एलटीव्हीसाठी अर्ज केला होता.

अधिक वाचा ; नवनीत राणा यांनी अमरावतीत महिलांसोबत केले वटसावित्री पूजन 

व्हिसा मुदत बाह्य होत असल्याने साजिदला भारतात परत यावं लागलं.

दरम्यान साजिद आणि जैनब सयानी या दोघांचा संसार अगदी व्यवस्थित सुरु होता. यांच्या लग्नाला चार वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांना आयशा नावाची मुलगीही झाली.  कराचीत जैनाबच्या आईची प्रकृती बिघडली, त्यामुळे १ सप्टेंबर २०१८ रोजी जैनाब, पती साजिद, मुलीला घेऊन कराचीला गेली. त्यानंतर व्हिसा मुदत बाह्य होत असल्याने साजिदला भारतात परत यावं लागलं. तर गर्भवती असल्याने प्रवास करणे अशक्य असल्याने तिला कराचीतच राहावं लागलं. याच दरम्यान जैनाबला दुसरी मुलगी झाली.

अधिक वाचा : पावसात अचानक झाडावर पडली भयानक वीज, पाहा धक्कादायक व्हिडीओ

जैनाब दोन मुलींना घेऊन तिच्या पतीकडे येण्यासाठी आतुर आहे

त्यानंतर जैनब भारतात येणार होती तोपर्यंत लॉकडाऊन लागला आणि तिला व्हिसा मिळाला नसल्याने ती तिथेच अडकून पडली. त्यानंतर लॉकडाऊनमुळे साजिदला व्हिसासाठी कागदपत्रे पाठवण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे जैनाब दोन मुलींसह कराचीत अडकून आहे. सध्या मोठी मुलगी 6 वर्षांची तर लहान 3 वर्षांची आहे. जैनाब दोन मुलींना घेऊन तिच्या पतीकडे येण्यासाठी आतुर आहे आणि त्यासाठी सरकारने मदत करावी असे आवाहन करत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी