बेरोजागारी घेतेय जीव; हाती काम नसल्यामुळे अभियंतानं आईच्या पोटात खुपसला चाकू, नंतर केली आत्महत्या

नागपूर
भरत जाधव
Updated Apr 27, 2022 | 17:49 IST

नागपूरमध्ये (nagpur ) हत्या (Murder )आणि आत्महत्येची (suicide) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या पोटात चाकून खुपसल्यानंतर अभियंता (Engineer) असलेल्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लीला विष्णू चोपडे (वय ७४) व श्रीनिवास विष्णू चोपडे (वय ५१), अशी मृतकांची नावे आहेत. 

Unemployed engineer stabbed his mother
हाती काम नसल्यामुळे अभियंतानं आईच्या पोटात खुपसला चाकू  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • श्रीनिवास हे अभियंते होते. गेल्या काही महिन्यांपासून ते बेरोजगार होते.
  • काही दिवसांपूर्वी त्यांनी आई लीला यांच्या पोटावर चाकूने वार केले.

नागपूर :  नागपूरमध्ये (nagpur ) हत्या (Murder )आणि आत्महत्येची (suicide) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईच्या पोटात चाकून खुपसल्यानंतर अभियंता (Engineer) असलेल्या मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लीला विष्णू चोपडे (वय ७४) व श्रीनिवास विष्णू चोपडे (वय ५१), अशी मृतकांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हे अभियंते होते. गेल्या काही महिन्यांपासून ते बेरोजगार होते. त्यामुळे ते तणावात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी लीला यांच्या पोटावर चाकूने वार केले. त्यात लीला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीनिवास यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. दरम्यान, लीला यांची मुंबईला राहणाऱ्या मुलीने त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. प्रतिसाद मिळाला नाही. त्या सतत आईच्या मोबाईलवर संपर्क साधायच्या. प्रतिसाद मिळत नसल्याने मुलीने बोखारा येथे राहणारे नातेवाइक सागर प्रभाकर इंगळे (वय ३५) यांना घरी जाण्यास सांगितले.

सागर हे हिंदुस्थान कॉलनी येथे आले. लीला यांच्या घराच्या दरवाजाला दरवाजाला कुलूप होते. त्यांनी आवाज दिला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. मग सागर यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. कुलूप तोडून पोलीस घरात गेले. कुजलेल्या स्थितीत दोघांचे मृतदेह आढळले. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. धंतोली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी