Cattle Trafficked : खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या साहाय्याने गोशाळा चालकाकडून जनावरांच्या कत्तलीसाठी तस्करी, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

89 animals trafficked with the help of fake death certificates ; सदर गोतस्करीच्या रॅकेटमध्ये 3 महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सदर बळीराम गौशाळा ही पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून या गौशाळेत 152 जनावरे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 89 जनावरांची सदर गौशाळेच्या संचालकांनी परस्पर विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

89 animals trafficked with the help of fake death certificates
खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने 89 जनावरांची तस्करी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल 89 जनावरांची तस्करी
  • 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने जनावरांची तस्करी
  • गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती

Cattle Traficed : भंडारा : खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या आधारे तब्बल 89 जनावरांची तस्करी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यातचं नवे तर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांनी दिलेल्या खोट्या मृत्यू प्रमाणपत्राच्या मदतीने गौशाला चालकाने तब्बल 89 जनावरांची कत्तलीसाठी परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी 4 पशुवैद्यकीय डॉक्टरांसह 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये गोशाळेच्या अध्यक्ष सचिवासह 13 संचालकांच्या समावेश असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. (using fake death certificate 89 cattle trafficked for beef in bhandara)

अधिक वाचा ; घरबसल्या चेक करु शकता एलआयसी पॉलिसीचं स्टेट्स, जाणून घ्या

गोतस्करीमध्ये तीन महिलांचा देखील सामावेश

मिळालेल्या माहितीनुसार, सदर गोतस्करीच्या रॅकेटमध्ये 3 महिलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सदर बळीराम गोशाळा ही पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथून या गौशाळेत 152 जनावरे पाठवण्यात आली होती. त्यापैकी 89 जनावरांची सदर गोशाळेच्या संचालकांनी परस्पर विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तर, काही जनावरे मृत पावली असता डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची तपासणी न करता पोलिसांना माहिती न देता किंवा शवविच्छेदन न करता परस्पर बनावट मृत्यू प्रमाणपत्र दिले होते. यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत याचा तपास केला असता मोठ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. हा सर्व गंभीर प्रकार समोर आल्याने सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील गोतस्करीमध्ये चक्क पशुवैद्यकीय डॉक्टर समाविष्ट असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा ; T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटवर कोरोनाचं सावट

या लोकावर करण्यात आला गुन्हा दाखल

डॉ तुळशीराम शहारे, डॉ हेमंतकुमार गभणे, डॉ दिनेश चव्हाण, डॉ सुधाकर खूने  या चार डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, लता मसराम, वर्षा वैद्य, माया चौसरे या महिलाच देखील यामध्ये समावेश असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, बळीराम गोशाळा सिरसाळाचे अध्यक्ष विसर्जन चौसरे, उपाध्यक्ष विपिन तलमले, सचिव मिलिंद बोरकर, सहसचिव खुशाल मुंडले, कोष्याध्यक्ष विलास तिघरे, सदस्य दत्तू मुनरतीवा, महेश मसराम, युवराज करकाळे, नानाजी पाटील , शिवशंकर मेश्रा या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सदर घटनेचा कसून तपास करत आहेत.

अधिक वाचा ; मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी