कॉंग्रेसचे मंत्री विजय वड्डेट्टीवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले आमची युती फक्त....

Vijay Wadettiwar targeted shivsena leader sanjay raut : काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, "आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल”

Vijay Wadettiwar targeted shivsena leader sanjay raut
कॉंग्रेसचे मंत्री विजय वड्डेट्टीवारांचं मोठं वक्तव्य,म्हणाले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला.
  • कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल - वड्डेट्टीवार
  • ९ जिल्ह्यात या योजनेत ५० घाणे तयार करण्यात येणार

भंडारा  : काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. विजय वड्डेट्टीवार यांनी म्हटलं आहे की, "आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल” असं विधान वड्डेट्टीवार यांनी केल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा द्यायच्या, असा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. त्यामुळे, आगामी काळात कॉंग्रेस आणि शिवसेना वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

संजय राऊत यांच्या टिकेचा वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला.

विजय वड्डेट्टीवार हे भंडारा येथील भंडाऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान आले असता त्यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी गोव्यात कॉंग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात कॉंग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याचं म्हटलं होत. राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यावर  वड्डेट्टीवार यांनी भंडाऱ्यांत समाचार घेतला आहे. यावेळी वड्डेट्टीवार यांनी ते संजय राऊत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबधित असल्याचे म्हणत राउत यांना टोला लगावला आहे. त्याचबरोबर शिवसेनेला युपीए मध्ये समाविष्ट करून घेण्यासंबधी लोकसभेच्या निवडणुका लागताच कांग्रेस हायकमांड निर्णय घेईल असही वड्डेट्टीवार यांनी म्हटलं आहे. आणि संजय राऊत यांच्या कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा युपीए मध्ये समाविष्ट होणार असल्याचा विश्वासही यावेळी विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.

कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल - वड्डेट्टीवार

दरम्यान, पुढे बोलताना वड्डेट्टीवार म्हणाले की, "आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत. त्याचबरोबर खोचक टोला लगावत वड्डेट्टीवार म्हणाले की,  इतर राज्यात युती करायची आहे किंवा नाही यावर निर्णय हायकमांड निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल. 

९ जिल्ह्यात या योजनेत ५० घाणे तयार करण्यात येणार 

ओबीसी विध्यर्थ्यांच्या हाताला काम लागाव यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत असून,  ओबीसी विद्यार्थ्यांना हाताला काम देण्यासाठी करडई क्लस्टर योजना सूरू करणार आहे. ९ जिल्ह्यात या योजनेत ५० घाणे तयार करण्यात येणार असून १५ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी १५ हजार हेक्टर करडई बियाने तयार करण्यात येणार असल्याचे वड्डेट्टीवार यांनीम्हटलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी