वर्ध्यात माकडांचा हैदोस, चवताळलेल्या दोन माकडांच्या हल्ल्यात कामगार गंभीर जखमी

वर्ध्यात चवताळलेल्या माकडाच्या हल्ल्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. शहरातील सय्यद साँ-मील परिसरात ही घटना घडली असून  नंदकिशोर हुडे (वय५४) असे जखमी कामगाराचे नाव आहे.   

wardha monkey attack
वर्ध्यात माकडांचा हल्ला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वर्धा जिल्ह्यात माकडांचा हैदोस.
  • मजुरावर दोन माकडांचा हल्ला.
  • मजूर गंभीर जखमी.

Wardha Moneky Attack : वर्धा : वर्ध्यात चवताळलेल्या माकडाच्या हल्ल्यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. शहरातील सय्यद साँ-मील परिसरात ही घटना घडली असून  नंदकिशोर हुडे (वय५४) असे जखमी कामगाराचे नाव आहे.   


मिळालेल्या माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते. दरम्यान साँ-मीलच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन माकडांत तुंबळ युद्ध सुरू होते. याचवेळी नंदकिशोर यांनी प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील चवताळलेल्या दोन माकडांनी थेट त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर स्वरुपाची इजा झाली.

त्यांना तत्काळ उपचारासाठी सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर शासकीय रुग्णालय वर्धा येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला दोन ठिकाणी गंभीर जखमा असल्याने दहा टाके पडले आहेत. सदर परिसरात माकडांचा मुक्त संचार असतो आणि अनेकजण माकडांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. माकडांच्या हल्ल्यात जखमी होण्याची ही तालुक्यातील पंधरावी घटना असल्याचे यावेळी ग्रामीण रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी