Bawankule's Big Statement : भाजपच्या मनातील गोष्ट आली बावनकुळेंच्या ओठावर; मोठा गेम होण्याची शक्यता

नागपूर
भरत जाधव
Updated Dec 18, 2022 | 18:05 IST

चंद्रशेखर बावनकुळे हे आज पूर्व नागपूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. विशेषतः या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.  

What was in BJP's mind came to Bawankule's lips
भाजपच्या मनातील गोष्ट आली बावनकुळेंच्या ओठावर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • चंद्रशेखर बावनकुळे हे आज पूर्व नागपूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित होते.
  • या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले.
  • आता मुख्यमंत्रीपदावर दावे, प्रतिदावे केले जात आहेत.

मुंबई :  राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून चालू होणार आहे. त्यात राज्याच्या सत्ता संघर्षाची लढाई ही न्यायालयात सुरू आहे. अशात भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) मोठं विधान केलं आहे. बावनकुळे यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ''मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी  (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाले पाहिजे.'' असे विधान (State president of BJP)चंद्रशेखर बावनकुळेंनी केले. हे विधान माध्यमात येताच अनेकांनी भुवया उंचावल्या. तर या विधानाचे अनेक तर्कवितर्क आता लावले जात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटासाठी हा सावधनतेचा इशारा समजावा का असंही म्हटलं जात आहे.  (What was in BJP's mind came to Bawankule's lips; Chances of a big game) 

अधिक वाचा  : बांगलादेशला हरवत भारताने जिंकली पहिली टेस्ट

चंद्रशेखर बावनकुळे हे आज पूर्व नागपूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हे वक्तव्य केले. विशेषतः या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.  

मनातील गोष्ट आज ओठावर

राज्यातील सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात असताना सरकारचे भवितव्यही अंधारात आहे. त्यातच आता मुख्यमंत्रीपदावर दावे, प्रतिदावे केले जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली गेली त्यावेळी अनेकांना धक्का बसला आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपजनांची इच्छा होती तिला छेद बसला. त्यानंतर आजही भाजपमधील अनेकांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हे वाटते. त्यातूनच चंद्रशेखर बावनकुळेंच्या मनातील गोष्ट आज ओठावर आली.  

अधिक वाचा  :Love Marriage नंतर पतीनं कटर मशीननं पत्नीचे केले अनेक तुकडे

या कार्यक्रमात बोलताना,  बावनकुळे म्हणाले, जो - जो समाज त्यांच्याकडे गेला, ज्या-ज्या समाजावर अन्याय झाला. तो अन्याय देवेंद्र फडणवीसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे, किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. महाराष्ट्राचे भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात. 

मोठा गेम होणार 

भाजप कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या वाढीसंदर्भात मोठं विधान केलं होतं. भारतातील प्रादेशिक पक्षांना मिटवून भाजपचं एक पर्याय निर्माण करण्यात यावा, असं आव्हान त्यांनी केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. त्यावेळी चर्चा देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात आल्याची चर्चा होऊ लागली होती. आता फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केलीय. यामुळे भाजप शिंदे गटासोबत मोठा गेम करणार की काय अशी शंका उपस्थित होत आहे. 

कारण संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्यात बोलताना बावनकुळे यांनी फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. बावनकुळे म्हणाले, फडणवीस हे जाती - पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. ते सर्व समाजासाठी काम करतात, म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे की, 2014 ते 2019 चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी