भाजी कापायच्या चाकूनेच केले पतीवर सपासप वार, कारण एकले तर....

wife attack on husband with knife : आपल्या पतीवर हल्ला केल्यावर हल्ल्यानंतर पत्नीने लगेच घटनास्थळावरून पळ काढला होता. यावेळी घराजवळील लोकांनी पती नागोराव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

wife attack on husband with knife
भाजी कापायच्या चाकुनेच केले पतीवर सपासप वार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आरोपी पत्नीनं घरी स्वयंपाक बनवला नव्हता त्यामुळे फिर्यादीचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता
  • पत्नीनेच आपल्या पतीला संपवायचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
  • पोलिसांनी पत्नीवर खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

यवतमाळ : एका महिलेनं भाजी कापायच्या चाकुनेचं आपल्या पतीवर सपासप वार (wife attack on husband with knife) केले आहेत. मोठ्या प्रमाणात वार झाल्याने पती गंभीरपणे जखमी झाला आहे. सदर घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

पत्नीनेच आपल्या पतीला संपवायचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतीवरच हल्ला केल्यावर पत्नीने घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, पत्नीने केलेल्या हल्ल्यात पती हा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात उपाचारासाठी पाठवण्यात आले होते. मात्र , पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.

या घटनेचा पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत. बुधवारी पोलिसांनी पत्नीवर खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत (attempt to murder) गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. (wife attack on husband with knife in Yavatmal )

आरोपी पत्नीनं घरी स्वयंपाक बनवला नव्हता त्यामुळे फिर्यादीचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता

गंगा सागर शिनकरे असं गुन्हा दाखल झालेल्या ३० वर्षीय पत्नीचं नाव आहे. तर, नागोराव शिनकरे वय – ३० वर्षीय असं फिर्यादी पतीचे नाव आहे. संबंधित दाम्पत्य उमरखेड तालुक्यातील करंजी येथील रहिवासी आहे.  मिळलेल्या माहितीनुसार या दोघा पत्नी आणि पत्नीमध्ये सतत कुठल्या न कुठल्या कारणावरून वाद होत होता. मात्र , घटनेच्या दिवशी रात्री आरोपी पत्नीनं घरी स्वयंपाक बनवला नव्हता. त्यामुळे फिर्यादीचा आपल्या पत्नीसोबत मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता.

घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होत. यावेळी पत्नीने पतीला 'तुझी एखाद्या दिवशी सोय लावते' असं म्हणत पतीला धमकी दिली असल्याची माहिती दिली होती. यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढत गेला. यातूनच संतापलेल्या पत्नीने भाजी कापायच्या चाकूने पतीच्या पोटावर सपासप वार केले आहेत.

या हल्ल्यात फिर्यादी पती हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर घाबरलेल्या पत्नीनं घटनास्थळावरून पळ काढला होता.

 

पतीची प्रकृती गंभीर

पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, आपल्या पतीवर हल्ला केल्यावर हल्ल्यानंतर पत्नीने लगेच घटनास्थळावरून पळ काढला होता. यावेळी घराजवळील लोकांनी पती नागोराव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांची प्रकृती सध्या गंभीर असून बुधवारी त्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात पतीने पत्नीविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी