भाजपने १३ नोव्हेंबरचा अमरावती बंद पुकारला होता, ती प्रतिक्रिया होती!

will maharashtra government impose ban on raza academy - devendra fadnavis महाराष्ट्र शासन १३ नोव्हेंबरचा बंद पुकारणाऱ्यांवर कारवाई करते पण १२ नोव्हेंबर रोजी हिंसा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करते. राज्य शासन १२ नोव्हेंबरच्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे; असा आरोप  देवेंद्र फडणवीस यांनी केला.

will maharashtra government impose ban on raza academy - devendra fadnavis
भाजपने १३ नोव्हेंबरचा अमरावती बंद पुकारला होता, ती प्रतिक्रिया होती! 
थोडं पण कामाचं
  • भाजपने १३ नोव्हेंबरचा अमरावती बंद पुकारला होता, ती प्रतिक्रिया होती!
  • घाला रझा अकादमीवर बंदी
  • देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न

will maharashtra government impose ban on raza academy - devendra fadnavis अमरावती: त्रिपुरामध्ये जी घटना घडली नाही तिचे भांडवल करुन अमरावती जिल्ह्यात १२ नोव्हेंबर २०२१ रोजी हिंसा करण्यात आली. विशिष्ट समाजाच्या घरांना आणि दुकानांना लक्ष्य करुन तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. मालमत्तेची हानी करण्यात आली. या प्रकाराला प्रतिक्रिया देण्यासाठी १२ नोव्हेंबरच्या हिंसेचा निषेध करण्यासाठी भाजपने १३ नोव्हेंबर २०२१ रोजी अमरावती बंद पुकारला होता; असे महाराष्ट्राचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र शासन १३ नोव्हेंबरचा बंद पुकारणाऱ्यांवर कारवाई करते पण १२ नोव्हेंबर रोजी हिंसा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करते. राज्य शासन १२ नोव्हेंबरच्या घटनांकडे दुर्लक्ष करत आहे; असा आरोप  देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांनी आज (रविवार २१ नोव्हेंबर २०२१) अमरावती जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर १२ नोव्हेंबरच्या हिंसेत ज्यांचे नुकसान झाले अशांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी थेट सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. 

रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच दंगली करते आणि पोलिसांवर हल्ले करते. याआधीही रझा अकादमीने काँग्रेसच्या काळातच आझाद मैदानात मोर्चा काढला होता आणि पोलिसांवर हल्ले केले होते. आणि आता पुन्हा पोलिसांवर हल्ले केले आहेत. जर रझा अकादमी ही भाजपाची टीम बी असे म्हणता, तर आम्ही सरकारकडे मागणी करतो की, आता लगेच रझा अकादमीवर बंदी आणावी, सरकारची हिंमत होणार नाही. कारण रझा अकादमी कुणाचे पिल्लू आहे, हे सर्वांना ठाऊक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

आम्ही हिंसेचे समर्थन करत नाही. पण १२ नोव्हेंबरच्या घटनांकडे डोळेझाक करुन १३ नोव्हेंबरविषयी बोलत आहेत. कारवाई फक्त १३ नोव्हेंबरच्या घटनांशी संबंधित असलेल्यांवर सुरू आहे. पण १२ नोव्हेंबरच्या हिंसेला कारणीभूत असलेल्यांविरोधात कारवाई झालेली नाही. पालकमंत्री यशोमती ठाकूरही बोलत नाही. विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करणे आम्हाला मान्य नाही. पण चुकीच्या घटनेचे  लांगूलचालन होत असेल तर आम्हाला मान्य नाही, असे सांगतानाच १२ तारखेच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. त्याचे कारण काय? मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न तर नाही ना? ही शंका वाटते, असे फडणवीस म्हणाले. 

राजकीय दबावाखाली पोलिस एकतर्फी कारवाई करत असतील, तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. नाहीतर जेलभरो आंदोलन करू. खोट्या गुन्ह्यात टाकायचे असेल, तर आम्हीच तुरुंगात येतो. एकतर्फी कारवाई बंद करा, असे सांगतानाच या घटनेची गृहमंत्र्यांना माहिती दिली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  1. अमरावती येथील घटनाक्रम दुर्दैवी. अमरावती येथील मोर्चाला परवानगी कुणी दिली? याची चौकशी झाली पाहिजे.
  2. आदल्या दिवशी झालेला घटनाक्रम दुर्लक्षित करायचा आणि केवळ दुसऱ्या दिवशीच्या घटनांवर केवळ लक्ष केंद्रीत करायचे हे योग्य नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात येत आहे. टार्गेट करून, याद्या तयार करून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे.
  3. एका घटनेसाठी चार-चार पोलिस ठाण्यात कारवाई! ज्यांचा काही संबंध नाही, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जात आहे. जर खोट्या गुन्ह्यात अडकवायचे असेल तर आमचे सारे कार्यकर्ते एकत्र जेलभरो आंदोलन करतील.
  4. त्रिपुरा येथे जी घटना घडली नाही, त्यावर १२ तारखेचा मोर्चा निघाला. हे मोर्चे मोठ्या षडयंत्राचा भाग होता. मात्र जणू १२ तारखेला काही घडलेच नाही, असे सांगण्याचा राज्य सरकार आणि पोलिसांचा प्रयत्न आहे. संपूर्ण पोलिस यंत्रणा प्रचंड दबावात काम करते आहे.
  5. त्रिपुरामध्ये ज्या घटना घडल्या नाहीत, त्यावर वातावरण तापवले गेले. तेथील पोलिसांनी सर्व बाबींचा उलगडा केला. तरी सुद्धा ८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी त्यावर ट्विट केले.
  6. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला विरोध करू शकत नाही, तेव्हा संपूर्ण देशात लांगूलचालन करून अराजकता माजविण्याचा प्रयत्न. असेल हिंमत तर घाला रझा अकादमीवर बंदी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी