Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर

आपल्या स्पष्ट स्वभावामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे नेहमी चर्चेत असतात. आता गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकतंच भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे गडकरी यांचे पंख कापले जात असल्याची चर्चा सुरू होती.

थोडं पण कामाचं
  • आपल्या स्पष्ट स्वभावामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे नेहमी चर्चेत असतात.
  • आता गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
  • नुकतंच भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते.

Nitin Gadkari : नागपूर :  आपल्या स्पष्ट स्वभावामुळे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी हे नेहमी चर्चेत असतात. आता गडकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विहरीत उडी मारून जीव देईन पण काँग्रेसमध्ये सामील होणार नाही असे विधान गडकरी यांनी केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले असून त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ED ची नजर आता पवार कुटुंबियांवर, आमदार रोहित पवार आता रडारवर

नुकतंच भाजपच्या संसदीय समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे गडकरी यांचे पंख कापले जात असल्याची चर्चा सुरू होती. आता नागपुरात नितीन गडकरी यांची मुलाखत सुरू होती, तेव्हा गडकरी म्हणाले की नागपूरमध्ये श्रीकांत जिचकर हे मोठे काँग्रेसचे नेते होते, आणि मी नागपूरमध्ये विद्यार्थीदशेत असताना काम करत होतो, तेव्ह जिचकर म्हणाल की गडकरी तुम्ही योग्य व्यक्ती आहात पण चुकीच्या पक्षात आहात, तुमच्या भारतीय जनता पक्षाला कुठलेच भविष्य नाही, तुम्ही काँग्रेसमध्ये या असे जिचकरांनी गडकरींना सांगितले. परंतु विहिरीत उडी मारून जीव देईन परंतु काँग्रेस पक्षात आपण सामील होणार नाही असे गडकरी म्हणाले, काँग्रेसची विचारसरणी आपल्याला पटत नाही असेही गडकरी म्हणाले.

Pune Crime News: पाळीव कुत्रीवर ६५ वर्षीय वृद्धाकडून अनैसर्गिक अत्याचार, Video समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी