Pooja Chavan Death : यवतमाळ : यवतमाळचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यामुळे पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. आता आमदार संजय राठोड यांनीही एकनाथ शिंदेसोबत बंडखोरी केल्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिडले आहेत. पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणतील सर्व पुरावे समोर आणू असा इशारा यवतमाळ जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सीडीचे राजकारण चांगलेच तापले आहे. संजय राठोड यांनी आत्महत्या केल्यानंतर यवतमळचे शिवसेनेचे पदाधिकारी पुजा चव्हाणला न्याय मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. या प्रकरणी वणी तालुक्यात मोर्चाही निघाला होता. बंजारा समाजाची मुलगी पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांनी दिला.