नागपूर : सध्या नागपूरमध्ये (Nagpur)विधिमंडळाचे ( Assembly) हिवाळी अधिवेशन (Winter Session)सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील मंत्री राज्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार आरोपांचा भडीमार केला. विरोधकांच्या आरोपांचा मारा पाहून कृषीमंत्र्यांची भांबेरी उडाली. विरोधकांच्या आरोपांना लगेच उत्तर देण्याची हिम्मत सत्तारांकडे राहिली नाही. (Agriculture Minister locked himself up for four hours after opposition's accusations)
अधिक वाचा : Chanakya Niti :'या' तीन गोष्टी उद्धवस्त करतात माणसाचे आयुष्य
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या सत्तार यांच्यावर आता जमीन घोटाळ्याचा आरोप होत आहे. सिल्लोड मतदारसंघात होणाऱ्या कृषी प्रदर्शनासाठी कृषी विभागात पैसे वसूल करण्यात येत असल्याचा आरोपही सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे. सोमवारी सभागृहातील विरोधकांचा आक्रमकपणा पाहून अब्दुल सत्तार यांची उत्तर देण्याची हिम्मत झाली नाही. विरोधकांचा आक्रमकपणा पाहून सत्तारांनी स्वत:ला एका खोलीत तब्बल चार तास कोंडून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर काय बोलणार याकडे लक्ष लागेल होते, परंतु विरोधकांच्या आरोपांना आपण मंगळवारी म्हणजेच आज उत्तर देणार असल्याचं सत्तार म्हणालेत. त्यामुळं पवारांच्या आरोपावर सत्तार नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे. वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन खासगी व्यक्तीला हस्तांतरित केल्या प्रकरणी कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
अधिक वाचा : समुद्रात पकडली PAKची बोट, 40 किलो ड्रग्स जप्त; 10 अटकेत
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदारांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत उतरून सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विरोधकांनी अध्यक्षांसमोर ठाण मांडत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज तीन वेळा तहकूब होऊन नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ सिल्लोडमध्ये 1ते 10 जानेवारी दरम्यान कृषी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवासाठी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कोठ्यावधी रुपयाची वर्गणी जमा करण्याचे आदेश कृषमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याचा आरोप आहे. अब्दुल सत्तार यांनी कोट्यावधी रुपये कृषी महोत्सवासाठी मागितल्याने कृषी आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.
अधिक वाचा : मित्रांना घरी बोलवण्यापूर्वी ड्राय डेजची यादी वाचा
कृषी महोत्सवात व्हीआयपी प्रवेशासाठी चार प्रकारचे पासेस तयार करण्यात आले आहेत. प्लॅटिनमसाठी पंचविस हजार, डायमंडसाठी पाच हजार, गोल्डसाठी दहा हजार, सिल्वर प्रवेशिकेसाठी पाच हजार रुपये, अशा चार प्रकारच्या प्रवेशिका कृषी विभागाकडून सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पाठवल्या आहेत. या प्रवेशिका प्रत्येक तालुका कृषी अधिकारी मार्फत तालुक्यातील खते आणि किटकनाशक बियाणे विक्रेत्यांना द्यायचे आहेत. त्या बदल्यात पैसे गोळा करून ते कार्यालयाकडे जमा करण्याच्या तोंडी सूचना दिली असल्याची माहिती आहे.
महसूल राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यातील 150 कोटी रुपये किमतीची गायरान जमीन एका खासगी व्यक्तीला बेकायदा बहाल केल्याचा आरोप आहे. वाशीम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधील 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा 150 कोटींचा आहे. गायरान जमीन कुणाला देता येत नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. असे असताना, योगेश खंडारे यांनी गायरान जमिनीसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. सरकारी गायरान जमीन हडप करण्याचा डाव असल्याचे निरीक्षण नोंदवत जिल्हा न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे. यात मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांच्याकडून सर्व प्रकरणाची माहिती मागवली आहे. दरम्यान, याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आज विधानसभेत स्पष्टीकरण देणार आहेत.