मोठी बातमी : शिवसेनेच्या महिला शहर प्रमुखावर हल्ल्या प्रकरण, जिल्हाप्रमुखांवरचं संशय, पोलिसांनी दोघांना केली अटक

woman city chief ranjana poulkar attacked case new update ; उद्धव ठाकरे गटाच्या नव्यानेच नियुक्त झालेल्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या आसपास भर दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली

woman city chief ranjana poulkar attacked case new update
ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखावर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी हल्ला करण्यात आला होता
  • या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे
  • दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता

वाशिम : उद्धव ठाकरे गटाच्या नव्यानेच नियुक्त झालेल्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या आसपास भर दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आता पौळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. काल रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलीस उपविभागीय अधिकारी पुजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पौळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

अधिक वाचा ; गिल,धवन,अय्यरची तुफानी खेळी, न्यूझीलंडला हव्यात इतक्या धावा

दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता

मिळालेल्या माहितीनुसार, महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये पोलिस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद बांधकाम सभापती सुरेश मापारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी गेले असता, ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे अकोला येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत. मात्र त्यांचे दोन भाचे व अन्य दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नव्यानेच नियुक्त झालेल्या महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या आसपास भर दिवसा ग्रामीण पोलीस स्टेशन समोरील रस्त्यावर चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या पोटात व छातीत चाकू हल्ल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

अधिक वाचा ; बायका 'हे' काम करत असतील पुरुषांनी लगेच फिरवावेत आपले डोळे

या दोन आरोपींना करण्यात आली आहे अटक?

दरम्यान चौकशीतून जिल्हाप्रमुख सुरेश मापारी त्यांचे भाचे नितीन कावरखे, भगवान शंकर वाकुडकर, यांचे नावं समोर आल्याने त्यांनाही अटक करण्यात आली आहे. तर जिल्हाप्रमुख सुरेश मापारी संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला मदत करणाऱ्या अब्दुल जुबेर अब्दुल जब्बार, अब्दुल वाजीद उर्फ गोऱ्या या दोन आरोपींना अटक केली होती, असं असलं तरी मात्र प्रत्यक्ष हल्ला करणारा मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिक वाचा ; बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा मृत्यू,18 डिसेंबरला होते लग्न

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी