CCTV : चालत्या ट्रेनमध्ये चढताना महिला पडली, आरपीएफ जवानाने वाचवले जीव, घटना सीसीटीव्हीत कैद

Nagpur railway cctv नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एक महिला चढण्याच्या प्रयत्न करत होती. परंतु ही महिला चालत्या गाडीतून खाली पडली. तेव्हा तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांनी तात्काळ तिला पकड़ले महिलेचा जीव वाचवला. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

थोडं पण कामाचं
  • नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एक महिला चढण्याच्या प्रयत्न करत होती.
  • परंतु ही महिला चालत्या गाडीतून खाली पडली.
  • तेव्हा तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांनी तात्काळ तिला पकड़ले महिलेचा जीव वाचवला.

Railway CCTV : नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये एक महिला चढण्याच्या प्रयत्न करत होती. परंतु ही महिला चालत्या गाडीतून खाली पडली. तेव्हा तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांनी तात्काळ तिला पकड़ले महिलेचा जीव वाचवला. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडू एक्स्प्रेस क्रमांक १२६२१ ही गाडी नागपूर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबली होती.  काही वेळाने गाडी मुक्कामाच्या दिशेने निघाली.  गाडीचा वेग कमी होता.  काहीसा वेग घेतल्यानंतर दोन महिलांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला.  यामध्ये महिला प्रवासी केरळमधील रहिवासी असलेल्या सरेना यांचा तोल गेल्याने ट्रेनच्या दरवाजातून खाली पडल्या.  कॉन्स्टेबल जवाहरसिंग यांनी तातडीने महिलेला पकडले त्यामुळे ती ट्रेनच्या धडकेपासून वाचली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी