नागपूरकरांसाठी गडकरींची जबरदस्त आयडिया!

नागपूर
रोहित गोळे
Updated Nov 24, 2022 | 17:19 IST

Nitin Gadkari Vision: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरकरांसाठी एक खास गोष्ट आणली आहे. जाणून घ्या गडकरी नागपूरकरांना नेमकं काय देणार आहेत.

worlds largest water show will be realized in nagpur from concept of nitin gadkari
नागपूरकरांसाठी गडकरींची जबरदस्त आयडिया! 
थोडं पण कामाचं
  • नागपुरात जगातील सर्वात मोठ्या फुटाळा वॉटर शोचे उद्घाटन
  • सरसंघचालक मोहन भागवतांकडून गडकरींचं कौतुक
  • नागपूरकरांसाठी गडकरींची जबरदस्त आयडिया!

Nitin Gadkari: नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जबरदस्त व्हिजन असणारे नेते आहेत. केंद्रात रस्ते वाहतूक मंत्री ते आपली छाप नेहमीच पाडतात. त्यांच्या अनेक प्रकल्पांची चर्चाही देशभरात होते. पण फक्त रस्ते आणि वाहतूक एवढ्या पुरताच मर्यादित न राहता गडकरी हे आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी नेहमी असं काही तरी करतात की ज्यामुळे नागपूरकर त्यांच्या पदरात भरभरुन मतं टाकतात. (worlds largest water show will be realized in nagpur from concept of nitin gadkari)

मतदारांना कसं खुश करावं, नागरिकांना काय हवंय याची जाण गडकरींना अचूक आहे. याचंच एक उदाहरण नुकतंच आपल्याला पाहायला मिळालं.

अधिक वाचा: एक वेळ डोळे दान करता येतील पण विकासाची दृष्टी नाही: नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपुरात उभारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या फुटाळा वॉटर शोचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह कृष्ण गोविंद यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारकही उपस्थित होते.

नागपुरातील फुटाळा तलाव येथील सर्वात उंच तरंगणाऱ्या म्युझिकल फाउंटनद्वारे देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आणि नागपूरचा इतिहास पाण्याच्या पडद्यावर चित्रित करण्यात आलाय. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, गीतकार गुलजार यांचा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. 

अधिक वाचा: Nitin Gadkari : विहिरीत उडी मारून जीव देईन पण, नितीन गडकरी असे का म्हणाले? वाचा सविस्तर

गडकरींच्या याच कामाचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी तोंड बरंच कौतुक केलं आहे. तसेच नितीन गडकरींच्या व्हिजनची देखील तोंडभरुन स्तुती केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी