Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या वक्तव्यामुळे वाद, शिवसेनेने दिली प्रतिक्रिया

आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यावर शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

sharad pawar
शरद पवार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते
  • असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
  • यावर शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Sharad Pawar : अमरावती : आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे. यावर शिवसेनेच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (yashomati thakur statement over sharad pawar and chief minister of maharashtra)

अमरावतीत एका कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, शरद पवार हे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना राज्याच्या चांगलाच अनुभव आहे. आज जर शरद पवार मुख्यमंत्री असते तर राज्याचे चित्र वेगळे असते असे मत ठाकूर यांनी दिली. या वेळी शरद पवारही उपस्थित होते. 

नीलम गोर्‍हे यांनी दिली प्रतिक्रिया

यावर शिवसेना नीलम गोर्‍हे म्हणाल्या की यशोमती ठाकूर या माझ्या चांगल्या मैत्रीण आहेत.  उध्दव ठाकरे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि हे सत्य आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, फक्त मुख्यमंत्रीपद नव्हे तर केंद्रीय मंत्रिपदाचा त्यांना अनुभव आहे. तसेच देशातील अनेक राज्यांत शरद पवार यांचा दांडगा संपर्क आहे असेही गोर्‍हे म्हणाल्या. शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी मागणीही गोर्‍हे यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी