यवतमाळ : यवतमाळमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अंगणात किलबिलाट करीत खेळत असलेल्या चिमुकलीला तिच्याचं काकूने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर चिमुकलीचे वय तीन वर्षे होते. आर्णी तालुक्यातील कुऱ्हा गावत ही घटना घडली आहे. मानवी चोले असं खून झालेल्या चिमुकलीचे नाव असून, ही तीन वर्षांची मुलगी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता होती. मानवीला ठार मारून तिचा मृतदेह गव्हाच्या लोखंडी कोठीमध्ये ठेवण्यात आला होता.
सदर चुमुकालीचा खून करून तिचा मृतदेह गव्हाच्या लोखंडी कोठीमध्ये ठेवण्यात आला. मात्र, ५ दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागला आणि वास येत असल्याने तो घरामागील पाण्याच्या टाकी जवळ ठेवण्यात आला. दरम्यान, मृतदेह मिळाल्यावर पोलिसांनी काकूला ताब्यात घेतले असता काकू आपण गुन्हा केला नसल्याचे सांगत होती. मात्र, पोलिसी खाख्या दाखविताच दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सहा दिवसांपासून रहस्यमय बेपत्ता असलेल्या मानवी चोले या मुलीच्या खुनाचा आता उलगडा झाला आहे.
तीन वर्षीय मानवी ही २० डिसेंबर पासून घरासमोरूनच रहस्यमयरित्या अचानक बेपत्ता झाली होती. अशी तक्रार मृत मानवीचे वडील अविनाश चोले यांनी आर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, काहीही केलं तरी मानवी सापडत नव्हती. चिमुकलीला शोधण्यासाठी कुऱ्हा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी गावाशेजारील जंगल, शेत शिवारासह अख्खा परिसर वन विभागाच्या मदतीने पोलिसांनी पिंजून काढला होता. मात्र कुठेही मानवीचा शोध लागत नव्हता. पोलिसांचे विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथके व सायबर सेलचे एक अशी चार पथके मानवीला शोधण्यासाठी गठीत करण्यात आली होती.
मानवीला शोधण्यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होती. गावामध्ये सतत पोलिसांचा वावर असल्याने आरोपी म्हणजेच चुलत काकू दिपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची संधी मिळाली नाही. तिने तिचा मृतदेह गव्हाच्या कोटीत ठेवला होता. परंतु, मानवीच्या मृतदेहाचा दुर्गंधी सुटू लागली त्यावेळी तिने मृतदेह घराच्या मागील बाजूस पाण्याच्या टाकीजवळ टाकून दिला. मानवीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच श्वानपथक बोलावून तपास सुरू करण्यात आला श्वानपथकने मानवीच्या शरीराभोवती पडलेले गव्हाचे दाणे आरोपीच्या घरातील स्वयंपाक घरापर्यंत पोचवले. त्याचबरोबर कोठीपासून मृतदेहापर्यंत गव्हाचे दाणे ठीक ठिकाणी पडले होते.
यावरून पोलिसांनी हा खून त्या घरातील व्यक्तीने केला असा संशय व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी मानविच्या काकुला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी काकुचे बिंग फुटले. पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तिने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. ज्या दिवशी मानवीचे अपहरण केले त्याचदिवशी तिला ठार केले व तिचा मृतदेह स्वयंपाक घरातील गव्हाच्या छोट्या कोठीमध्ये लपवून ठेवला होता अशी देखील माहिती मिळाली आहे.