लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अमरावतीच्या तरुणीसोबतही घडली धक्कादायक घटना

youngster arrested due to create pressure on her girlfriend in amaravati : आरोपी हा सतत युवतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने मला तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप राहायचे नाही, असं अमनला सांगितले. त्यानंतर आरोपीने मुलीचे घर गाठले. आणि शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला.

youngster arrested due to create pressure on her girlfriend in amaravati
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अमरावतीच्या तरुणीसोबतही घडली धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एका प्रियकराने तरुणीच्या घरी जाऊन आपल्या हातावर सपासप धारदार ब्लेडने वार केले
  • लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना आपल्या प्रेयसी सोबत खटके उडाल्यानंतर आरोपीने केले स्वतःवर वार
  • तू जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करतो, अमनने दिली होती धमकी

अमरावती : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या श्रद्धाची अफताबने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानच अमरावतीमध्ये देखील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना आपल्या प्रेयसी सोबत खटके उडाल्यानंतर एका प्रियकरानं तिच्याच घरी जाऊन आपल्या हातावर सपासप धारदार ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, आपल्या प्रेमाचा भयंकर पद्धतीने प्रदर्शन करणे आरोपीच्या प्रियकराच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसतयं. कारण, फ्रेझरपुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न करणे व विनयभंग करत शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा ; रिक्षा चालकाकडून अश्लील चाळे,घाबरलेल्या मुलीची रिक्षातून उडी

नेमकी काय घडली घटना?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून एका युवती सोबत 26 वर्षीय आरोपी अमन रामराव रौराळे हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र, आरोपी हा सतत युवतीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याने मला तुझ्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप राहायचे नाही, असं अमनला सांगितले. त्यानंतर आरोपीने मुलीचे घर गाठले आणि शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने युवतीला वारंवार फोन करुन धमक्या दिल्या असल्याचे देखील तिने तक्रारीत म्हटले आहे.

अधिक वाचा ; उस्मानाबादमध्ये विचित्र अपघात, आयशरने दिली मागून दिली धडक 

तू जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करतो – अमन

दरम्यान, आरोपी अमन हा सतत तरुणीला फोन करून धमक्या द्यायचा. त्याचबरोबर आरोपीने इमोशनल ब्लॅकमेल करत संबंधित फिर्यादी तरुणीला तू जर मला भेटली नाही तर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करतो, अशी धमकी देखील दिली होती. त्यानंतर देखील तरुणीने अमनचे काहीही ऐकले नसल्याने अमन तिच्या घरी आला आणि तिला आवाज दिला. मात्र, आरोपीच्या गोष्टीला प्रतिसाद दिला नसल्याने आरोपीने स्वतःच्याच डाव्या हाताच्या मनगटावर प्लेट्स चिरे मारले. स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पीडित तरुणीने पोलिसांमध्ये दिली आहे.  

अधिक वाचा ; विराट कोहलीचा कोण आहे फोनवाला फ्रेंड? समोर आली संपूर्ण बाब

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी