Rescue To Camel :  हैदराबादला कत्तलीसाठी जाणारी 58 ऊंट अमरावतीमध्ये जप्त; खासदार नवनीत राणांची धडक कारवाई

नागपूर
Updated Jan 12, 2022 | 12:39 IST

MP Navneet Rana Rescue To Camel: कत्तलीसाठी (slaughter) प्राण्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. आज अमरावती (Amravati) मध्ये कत्तलीसाठी राजस्थानहून (Rajasthan) हैदराबादला (Hyderabad) जाणारी 58 ऊंट (Camel) पकडण्यात आली आहेत.

थोडं पण कामाचं
  • खासदार नवनीत राणा यांना संपर्क केल्यानंतर ऊंटाची सुटका.
  • जप्त केलेली ऊंट सध्या अमरावतीमधील दस्तुरनगर येथील गो-रक्षण गोशाळेत ठेवण्यात आली आहेत.
  • जे व्यक्ती हे ऊंट पाळण्यास सक्षम असतील त्यांनी गो-रक्षणास संपर्क करून ऊंट देऊ शकतील.

MP Navneet Rana Rescue To Camel: अमरावती : कत्तलीसाठी (slaughter) प्राण्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. आज अमरावती (Amravati) मध्ये कत्तलीसाठी राजस्थानहून (Rajasthan) हैदराबादला (Hyderabad) जाणारी 58 ऊंट (Camel) पकडण्यात आली आहेत. अमरावतीचे खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी तळेगाव दशासर (Talegaon Dashasar) पोलिसांच्या (Police) मदतीने या ऊंटांना जीवनदान दिले आहे. ऊंटांना राजस्थानपासून हैदराबादकडे घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना कोणत्याच जिल्ह्यात अडवण्यात आले नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 58 ऊंटांना पायी चालवून हैदराबादला कत्तलीसाठी  नेली जात होती. राजस्थानमधून निघाल्यानंतर साधरण दोन ते तीन दिवसांनंतर हे ऊंट अमरावती येथे पोहचली, आणि त्यांची सुटका करण्यात आली. हे ऊंट कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा संशय काही लोकांना आला, तेव्हा काही लोकांनी या ऊंटांचा पाठलाग सुरू केला. अमरावतीमधील काही जिल्हे पास केल्यानंतर कोणीच विचारणा केली नसल्यानं पाठलाग करणाऱ्या व्यक्तींनी खासदार नवनीत राणा यांना संपर्क करत या तस्करीवर कारवाई करण्यास सांगितले. फोनवरुन माहिती मिळाल्यानंतर नंतर खासदार नवनीत राणा यांनी पोलीस प्रशासनाला याची माहिती देत ऊंटांचा जीव वाचवला. दरम्यान पकडण्यात आलेले ऊंट दस्तुरनगर येथील गो-रक्षणात ठेवण्यात आली आहेत. 

याविषयी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, राज्यस्थानहून हैदराबादच्या दिशेने निघालेले 58 ऊंट अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी पकडले. हे ऊंट राज्यस्थान मधून 1200 किलोमीटर पायदळ नेऊन त्यांची हैदराबाद मध्ये कत्तल केली जाणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर देशात आता उंट तस्करीच मोठं रॅकेट या निमित्ताने उघडकिस येऊ शकतं असंही त्या म्हणालात. 

दरम्यान हे 58 उंट अमरावती शहरातील दस्तुरनगर येथील गो-ररक्षणात ठेवण्यात आले असून याची पाहणी नवनीत राणा यांनी गौरक्षणात जाऊन केली. हे ऊंट आपल्या प्रदेशात राहू शकत नाही, त्यामुळे राजस्थानमधील लोकांनी पुढाकार घेऊन यांची देखभाल करण्यासाठी आम्हाला लिहून द्यावे त्यानंतर विचार करून त्यांना सुपुर्द करण्यात येईल. यासाठी त्यांनी गोरक्षणाशी संपर्क साधावा असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी