आणखी एक प्रकल्प राज्याच्या बाहेर; सीएम म्हणतात, उद्योग येणं अन् जाणं हे काही जादूची कांडी नाही

नागपूर
Updated Nov 12, 2022 | 16:21 IST

मुख्यमंत्री भंडारामधील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण  करणार आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारासोबत संवाद साधला. राज्यात एकपोठापाठ प्रकल्प जात असल्याने विरोधक टीका करत आहेत. अशातच आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात महाराष्ट्र सरकारला मोठे अपयश आले आहे.

थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री भंडारामधील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण करणार आहेत.
  • राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती करू
  • ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात महाराष्ट्र सरकारला मोठे अपयश

भंडारा :  महाराष्ट्रातून (Maharashtra)प्रकल्प ( project) बाहेर जाण्याची मालिका अजूनही सुरूच आहे.  वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कनंतर आता ऊर्जा उपकरण निर्मितीचा प्रकल्प (Energy Equipment Manufacturing project) महाराष्ट्राच्या हातातून गेला आहे. एकापाठोपाठ उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis government) जोरदार टीका करत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्योग येणं आणि जाणं हे काही जादूची कांडी नाही की, जे फिरवली म्हणजे प्रकल्प जाईल आणि येईल. प्रकल्प येणं आणि जाणं हे याची प्रक्रिया असते, असं मत मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Shinde) यांनी मांडलं आहे.  (Another project out of state; CM says, coming and going of industries is not a magic stick )

अधिक वाचा  : अरे देवा! आता Amazonमधील 3766 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

मुख्यमंत्री भंडारामधील विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण  करणार आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारासोबत संवाद साधला. राज्यात एकपोठापाठ प्रकल्प जात असल्याने विरोधक टीका करत आहेत. अशातच आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात महाराष्ट्र सरकारला मोठे अपयश आले आहे. मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाने यात बाजी मारली आहे. केंद्र सरकारने सुद्धा यासाठी हिरवा कंदील दिला असल्याचे वृत दैनिक लोकमतने दिले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अधिक वाचा  : मधुमेह आणू शकतं अंधत्व, जाणून घ्या लक्षणे

आमचं सरकार हे विकास कामांना प्राधान्य देते, गेल्या तीन चार महिन्यात अडीच वर्षात जी कामं प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचे काम करतोय, विकासाभिमुख हे सरकार आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणे हा आमचा फोकस आहे आणि जे प्रकल्प थांबले आहेत त्यांना पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय, कुठलाही प्रकल्प असा तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असं होत नाही, जादूची कांडी नाही की इकडे आला आणि तिकडे गेला, आरोप करायचं तर कोणीही करू शकतो,मात्र आमचं जे सरकार आहे ते उद्योगांना चालना देणार आहे आणि नजीकच्या काळात आपल्याला दिसेल.

अधिक वाचा  : Mouth Ulcer : पोटाच्या उष्णतेमुळे तोंडात फोड येतात का?

आणि गेल्या चार महिन्यात काय केलं आणि अडीच वर्षात त्यांनी काय केलं हे दिसेल आणि भविष्यामध्ये जे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत ते आपल्याला दिसेल,कारण पंतप्रधान यांनी राज्य सरकारला आश्वास्त केलं आहे की या राज्यात मोठे उद्योग आणि रोजगार निर्मिती करू मी प्रधानमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो की दोन हजार कोटी रुपये आम्हाला दिले त्यामुळे विकासाभूमीक सरकार आहे, सर्वांगीण विकास राज्याचा आम्ही करणार आहोत. 

400 कोटींची प्रकल्प गेला

या झोन निर्मितीसाठी केंद्र सरकारने 400 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या हातातून बल्क ड्रग पार्कसाठी 1 हजार कोटी तर मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी 400 कोटी रुपये केंद्राकडून मिळणार होते. पण, आताही महाराष्ट्र सरकारच्या हातात काहीच आले नाही. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरू होते.

पण या प्रकल्पासाठी आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि तेलंगणा या 8 राज्यांनी प्रयत्न केले होते. यात मध्य प्रदेशने बाजी माारली. या आठही राज्यांनी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले होते. पण मध्य प्रदेश सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाने सर्वाधिक गूण मिळवले. मध्य प्रदेश सरकारच्या प्रस्तावाला 22 ऑक्टोबर 2022 रोजी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर याच महिन्यात 2 नोव्हेंबर रोजी मध्ये प्रदेशच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारने मंजुरीचे पत्रही दिले.

ऑन गजानन कीर्तिकर

काल गजानन कीर्तिकर साहेब आमच्याकडे आलेत, एक वरिष्ठ नेते खासदार आमच्याकडे आले त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला होईल, त्यांचं मार्गदर्शन, त्याच्या कामाचा अनुभव याचा फायदा आम्हाला आणि महाराष्ट्र होईल. 

 भंडारामध्ये विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण 

सरकार शासनाच्या कामांना गती आणि चालना देण्याचं काम करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून भंडारा मधील लोकाभिमुख विकासाची काम सुरू करत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी