Baliram Siraskar join BJP: भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) एक मोठा झटका दिला आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार (Baliram Siraskar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपचं कमळ आपल्या हाती घेतलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बळीराम सिरस्कार यांनी भाजपत प्रवेश केला.
बळीराम सिरस्कार यांनी २०१९ मध्ये भारिप बहुजन महासंघाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादीने पक्षप्रवेशापूर्वी दिलेल्या आश्वासनाकडे दुर्लक्ष होत असल्याने ते नाराज होते. बळीराम सिरस्कार हे दोनवेळा भारिप बहुजन महासंघाकडून बाळापूर मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी झाले होते.