Praniti Shinde : भारत जोडो यात्रेचा भाजपने धसका घेतला आहे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची टीका 

नागपूर
Updated Sep 23, 2022 | 09:20 IST

Praniti Shinde : कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच तळागाळातील आणि सर्व जाती धर्माला जोडण्याचे काम केले आहे, मात्र भाजप ते तोडण्याचे काम करत आहे अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भारत जोडो पदयात्रा काढली असून या यात्रेचा भाजपाने चांगलाच धसका घेतला आहे असे शिंदे म्हणाल्या.

थोडं पण कामाचं
  • कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच तळागाळातील आणि सर्व जाती धर्माला जोडण्याचे काम केले आहे,
  • भाजप ते तोडण्याचे काम करत आहे
  • याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भारत जोडो पदयात्रा काढली असून या यात्रेचा भाजपाने चांगलाच धसका घेतला आहे

Praniti Shinde : अकोला : कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच तळा गाळातील आणि सर्व जाती धर्माला जोडण्याचे काम केले आहे, मात्र भाजप ते तोडण्याचे काम करत आहे अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भारत जोडो पदयात्रा काढली  असून या यात्रेचा भाजपाने चांगलाच धसका घेतला आहे असे शिंदे म्हणाल्या. अकोल्यातील स्वराजभवन येथे भारत जोडो पदयात्रेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. (bjp get complex by bharat jodo yatra congress mla criticized bjp in akola)

अधिक वाचा : Crime : पुण्यात 13 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण, जातीवाचक शिवीगाळ...शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल

शिंदे म्हणाल्या की, या पदयात्रेचे आयोजन अकोला जिल्ह्यातील बाळापूर व पातूर तालुक्यात केले असून या पदयात्रेत कॉंग्रेस नेते राहूल गांधी सहभागी होणार आहेत. राहुल गांधी हे मोठ्या आलेशान हॉटेल मध्ये न राहता ते गरीबाच्या झोपडीत मुक्कामी करणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. कॉंग्रेसने जे देशासाठी दिले आहे ते विसरून चालणार नाही. देशाला एकजूट ठेवण्याची जबाबदारी काँग्रेस पदाधिकाऱ्याची आहे. कुणी सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून उपयोग नाही. भाजप देश फोडायचे काम करत आहे. देशाची एकात्मता आणि विविधता राखण्याची आपली जबाबदारी आहे. भारताचे तुकडे करणाऱ्या भाजपाला आता दाखवून द्यायचे. त्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेटून उठले पाहिजे पाहिजे असे आवाहनही प्रणिती शिंदे यांनी केले आहे. तसेच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी हे अकोला दौऱ्यावर येत असून अकोल्यात एक जाहीरसभा देखील होणार असल्याचही प्रणिती शिंदे म्हणाल्या.  

अधिक वाचा :  Ulhasnagar : भय इथले संपत नाही..., स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू ; ओटी चौकातील मानस टाॅवर इमारतीतील घटना

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी