Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी बाळासाहेंबांना अभिवादन करतात का ? भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सवाल

नागपूर
Updated Nov 17, 2022 | 22:25 IST

Chandrashekhar Bawankule :सावरकरांवरील वक्तव्यामुळे देशाची मान खाली गेली आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच राहुल गांधी कधी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतात का? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. 

थोडं पण कामाचं
  • सावरकरांवरील वक्तव्यामुळे देशाची मान खाली गेली आहे
  • अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
  • राहुल गांधी कधी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतात का? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. 

Chandrashekhar Bawankule : नागपूर : सावरकरांवरील वक्तव्यामुळे देशाची मान खाली गेली आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. तसेच राहुल गांधी कधी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतात का? असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.  (bjp maharashtra state president chandrshekhar bawankule criticized rahul gandhi over savarkar remark )

अधिक वाचा : 'या' निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, 10 पैकी 9 जागांवर विजय

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, सावरकरांबद्दल राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करत आहे आणि काँग्रेस पार्टी त्याचा समर्थन करत आहे. देशाची मान राहुल गांधी यांच्या वक्तव्याने खाली गेली आहे. राहुल गांधी यांना सावरकरांचा इतिहास माहीत असूनही ते जाणून बुजून तो इतिहास दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चुकीचे वक्तव्य केल्यामुळे देशाला त्यांच्याबद्दल घृणा निर्माण झाली आहे. देश राहुल गांधी यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी या यात्रेतून जे काही एक-दोन टक्के समर्थन कमावलं होतं तो या वक्तव्याने गमावला आहे असेही बावनकुळे म्हणाले. 

अधिक वाचा :  लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या अमरावतीच्या तरुणीसोबतही घडली धक्कादायक घटना

जेव्हा राजीव गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी असते तेव्हा उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी कुठेही प्रतिमेला फुल वाहिलीत का, चार शब्द ते बोलले का? असा सवाल बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.  उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.  ते काँग्रेसला समर्पित झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गट राहुल गांधींच्या यात्रेचा बहिष्कार जाहीर करतील अशी आमची अपेक्षा होती मात्र आदित्य ठाकरेंना ते पाठवतात फक्त उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा संविधान स्वीकारण्या एवढेच आता बाकी राहिले आहे असेही बावनकुळे म्हणाले. 

अधिक वाचा :  पोलिसच करायचे अमली पदार्थाची तस्करी, 2 लाखांच्या मुद्देमालासह दोन कर्मचारी अटकेत

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी