Devendra Fadanvis : या तारखेला समृद्धी महामार्गाचे होणार लोकार्पण, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

नागपूर
Updated Dec 04, 2022 | 07:43 IST

Devendra Fadanvis : ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हसते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या मार्गाचे उर्वरित काम आगामी सहा महिन्यांत पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हसते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे
  • अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
  • या मार्गाचे उर्वरित काम आगामी सहा महिन्यांत पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis : नागपूर : ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हसते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या मार्गाचे उर्वरित काम आगामी सहा महिन्यांत पूर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले. (deputy chief minister devendra fadanvis on samruddhi highway inauguration)

नागपूर विमानतळावर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डी या ५०० किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. उरलेले काम पुढील सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला होणार आहे.  यातून एक नवा इकोनॉमिक कॉरिडॉर निर्माण होणार आहे. या समृद्धी महामार्गामुळे १४ जिल्हे जोडले जातील. तसेच या महामार्गातून अनेक बंदरही जोडले जातील. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याची खरी समृद्धी होईल असेही फडणवीस म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी