Tanaji Sawant : फडणवीसांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात; बंडासाठी मी घेतल्या तब्बल दीडशे बैठका- सावंतांचा गौप्यस्फोट

नागपूर
Updated Mar 28, 2023 | 13:51 IST

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि नव-नवीन गौप्यस्फोट होत आहेत. सध्याचे आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी शिंदेंच्या बंडाविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शंभर ते दीडशे बैठका केल्या हा बंड देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने झाला असा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant)यांनी केला.

थोडं पण कामाचं
  • या बंडासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील आमदाराचं तानाजी सावंत काउंसलिंग करत होते.
  • देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शंभर ते दीडशे बैठका केल्या.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकला

मुंबई :  राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि नव-नवीन गौप्यस्फोट होत आहेत. सध्याचे आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी शिंदेंच्या बंडाविषयी नवा गौप्यस्फोट केला आहे.  उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शंभर ते दीडशे बैठका केल्या हा बंड देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने झाला असा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant)यांनी केला. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील परंडा शहरात कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात सावंत बोलत होते. (Fadnavis' order started the rebellion; I held as many as 150 meetings for the rebellion- Tanaji Sawant)

 सत्तांतरासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अनेक बैठका केल्या. या बंडासाठी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील आमदाराचं मी काउंसलिंग करत होतो. या सर्व गोष्टी मी सांगून करत होतो. कुठलीही गोष्ट झाकून केली नाही, असेही सावंत यांनी सांगितलं. सावंत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 
 
 यावेळी बोलताना सावंतांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमीत शहा यांच्या नेतृत्वात भाजप सेनेला लोकांनी बहुमत दिलं. सरकार स्थापनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकला. अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली. 
 
 तर दुसरीकडे तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या 25 टिएमसी पाणायासंदर्भात माझ्या सांगण्यावरूण सर्व सचिवांची बैठक लावली. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना या बैठकीला बोलावले नाही त्यामुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्यासाठी मोठी मदत झाली अशा शब्दात सावंत यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी