दिलीप कांबळे, टाइम्स नाऊ, नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या महत्त्वपूर्ण निर्णयात लैंगिक कामाला व्यवसाय म्हणून स्वीकारले आहे, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, या व्यवसायात प्रत्येक व्यक्तीला घटनेच्या कलम 21 नुसार सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, वय आणि परस्पर संमतीच्या आधारावर कायदा समान प्रमाणात लागू असावा. हे स्पष्ट आहे की सेक्स वर्कर्स प्रौढ आहेत आणि संमतीने सेक्स करत आहेत, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यापासून दूर राहावे, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये. (fireworks exploded by the sex workers in Nagpur)
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ आहे. न्यायालयाने कलम 142 अंतर्गत विशेष अधिकारांतर्गत हा आदेश दिला आहे.
या निर्णयाचे स्वागत करत नागपुरातील 100 वर्ष प्रसिद्ध गंगा जमुना येथे जल्लोष साजरा करण्यात आला, या निर्णयाचे स्वागत करताना सेक्स वर्कर्सनी गुलाल, फटाके फोडले, ढोलाच्या तालावर जल्लोष केला.