From Delivery Boy To pilot Nagpur Boy shrikant inspirational story : या जगात कोणाचे नशीब कधी चमकेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काही जण प्रगतीसाठी प्रचंड कष्ट करतात तर काही जणांना सहजतेने यश मिळत जाते. टाइम्स नाउ नवभारत आज आपल्याला अशा एका व्यक्तीला भेटविणार आहे ज्याने नशीब बदलण्यासाठी प्रत्येक पडेल ते काम केले. अमूक एक काम महत्त्वाचे किंवा श्रेष्ठ आणि अमूक एक काम दुय्यय असा भेदाभेद कधीही केला नाही. तो कधी डीलिव्हरी बॉय झाला तर कधी रिक्षा चालक. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत कष्ट करत राहिला. ही गोष्ट आहे नागपूरच्या श्रीकांत पानतवणेची (Shrikant Pantawane). ज्याने पायलट होण्याचे स्वप्न बघितले आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड प्रयत्न करुन यश मिळवले.