Sudhir Mungantiwar gets angry on officer: मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक पूर परिस्थितीत अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता दिसून आली. पूरपरिस्थितीत ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पोचलेल्या आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा रुद्रावतार यावेळी दिसून आला. मुसळधार पावसाची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोली अधिकाऱ्याची सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. (Heavy rainfall causes flood in chandrapur BJP sudhir mungantiwar gets angry on an officer while inspecting flood situation watch video)
पूरपरिस्थितीत ग्रामस्थांना सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलीचा हॉल देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. काही तासात मदत पोहचवा अन्यथा हिशोब करतो असा दमच मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्याला भरला. फोनवरुन अधिकाऱ्याची कानउघडणी करतानाचा मुनगंटीवार यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
काल चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुरामुळे नुकसान झालेल्या गावांना भेट दिली. व संबंधितांना सांगून पूरग्रस्त नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले. @bjp4_chandrapur @InfoChandrapur pic.twitter.com/vszVWRp4Nu — Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) July 21, 2022
अधिक वाचा : Viral Video: चित्रा वाघ, तुम्ही उद्या ब्ल्यू फिल्म टाकून त्याचंही उत्तर मागाल: रुपाली पाटील-ठोंबरे
या गावाच्या आसपास चुकीच्या पद्धतीने कोळसा खाणीतील मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्याने गावाला बसला पुराचा फटका बसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांप्रती दाखविला हलगर्जीपणा, संतापलेल्या मुनगंटीवार यांनी अधिकारी वर्गाला फैलावर घेतल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला.
अधिक वाचा : राज्यातील भाजपच्या महिला आमदारांची आर्थिक फसवणूक; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुधीर मुनगंटीवार हे पळसगाव येथील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी ग्रामस्थांनी प्रशासकीय अधिकारी मदत करत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी ग्रामस्थांच्या समोरच अधिकाऱ्याला फोन लावला. यावेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, इथं इतकी मातीचे ढिगारे आहेत... पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ग्रामस्थांनी तुमच्याकडे सुरक्षित ठिकाण म्हणून हॉल देण्याची मागणी केली मात्र, तुम्ही देण्यास नकार दिला. ही काय भूमिका आहे? तुमच्या घरचा आहे का हॉल? इथल्या नागरिकांना मदत करणं ही तुमची जबाबदारी आहे.
आता मी काही बोलत नाही, आता तर तुम्हाला फक्त मदत करायची आहे. या ग्रामस्थांपर्यंत सर्व साहित्य पोहोचलं पाहिजे. यानंतर समोरील अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तरानंतर मुनगंटीवार संतापले आणि म्हणाले, अरे भैया ५० जगह पर दे दो... अपने बाप का माल है क्या? लोक तुमच्या मुळे पाण्यात डुबत आहेत. आजच्या आज मदत मिळाली पाहिजे नाही मिळाली तर मी मदत करेन आणि नंतर तुम्हाला नंतर सांगतो सर्व हिशोब कसा असंही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.