Mohan Bhagwat : महिला आजही घरात कैद, दलितांवर आजही अन्याय; विजयादशमीच्या कार्यक्रमात सामाजिक मुद्द्यांना भागवतांनी घातला हात

नागपूर
Updated Oct 05, 2022 | 12:49 IST

Mohan Bhagwat : देशात आजही अनेक ठिकाणी दलितांना घोड्यावरून वरात काढता येत नाही, आजही महिला कैद घरात कैद आहेत, काळानुसार आपण बदलले पाहिजे असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला. तसेच करीअरमध्ये इंग्रजी भाषेची गरज नाही, मातृभाषेची गरज आहे असेही भागवत म्हणाले. 

थोडं पण कामाचं
  • देशात आजही अनेक ठिकाणी दलितांना घोड्यावरून वरात काढता येत नाही,
  • आजही महिला कैद घरात कैद आहेत,
  • काळानुसार आपण बदलले पाहिजे असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला.

Mohan Bhagwat : नागपूर : देशात आजही अनेक ठिकाणी दलितांना घोड्यावरून वरात काढता येत नाही, आजही महिला कैद घरात कैद आहेत, काळानुसार आपण बदलले पाहिजे असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात अनेक सामाजिक मुद्द्यांना हात घातला. तसेच करीअरमध्ये इंग्रजी भाषेची गरज नाही, मातृभाषेची गरज आहे असेही भागवत म्हणाले. 

अधिक वाचा :Milind Narvekar : ना ठाकरे, ना शिंदेंच्या मिलिंद नार्वेकरांनी घेतली गवळी-नाईकांची भेट

रेशीमबागेतील संघाच्या मुख्यालयात भागवत म्हणाले, मातृ शक्तीची उपेक्षा करणे चुकीचे आहे. महिलांना आपण जगत जननी म्हटले आहे आणि त्यांची पूजा करून त्यांना घरात कोंडून टाकले. आपल्यावर परदेशी लोकांचे आक्रमण झाल्यामुळे त्याला एक वैधता प्राप्त झाली आहे, परंतु परदेशी लोकांचे आक्रमण संपल्यानंतरही आपण महिलांना ते स्वातंत्र्य दिलेले नाही. जी कामे पुरुष करू शकतात तीच कामे महिलाही करू शकतात. मातृशक्तीच्या जागरणाचे काम आपल्या कुटुंबापासून केली पाहिजे असेही भागवत म्हणाले. 

अधिक वाचा : Mumbai : दसरा मेळाव्यामुळं वाहतुकीत बदल! हे रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या


बदलासोबत परंपरेची गरज

वेळेसोबत ज्ञान आणि विचार बदलतात. नव्या गोष्टींसोबत जुन्या विचारांचीही जोड असते. अन्यथा आयुष्याची अवस्था तुटलेल्या पतंगासारखी होईल. परंतु नवे विचार आत्मसात करताना सनातनी संस्कृती काय राखणे गरजेचे आहे. जे लोक भारताची प्रगती होऊ देत नाही, जे भारतात अराजकता, विध्वंस आणि दहशतवाद वाढवत आहेत त्यांच्यापासून आपण सावध असायाला हवे अशी भागवत म्हणाले. देशात कायद्याचा सन्मान व्हावा, शिस्त रहावी, घुसखोरी बंद हावी यासाठी प्रयत्न असायला हवे असेही भागवत म्हणाले.

अधिक वाचा : Maharashtra Cabinet Decision : सरकारकडून दिवाळी भेट; रेशनवर 100 रुपयांना मिळणार रवा, तेल, साखर आणि चना डाळीचे पॅकेट


विषमता दूर व्हावी

भागवत म्हणाले की विषमतेचे प्रत्येक रूप नष्ट झाले पाहिजे. सामाजिक आणि आर्थिक विशमता दूर करण्याची समाजाची जबाबदारी आहे. मंदिर, पाणी, स्मशानभूमी ही सगळ्यांसाठी एक आहे. समाजाला आपल्या जबाबदारीचे भान असले पाहिजे. जातीच्या आधारावर अधर्म, अस्पृश्यता चुकीची आहे. आजही घोड्यावरू काही समाजात वरात काढली गेल्यास वाद होतात. ही बाब चुकीची आहे असेही भागवत म्हणाले. 

अधिक वाचा : Dussehra Melava 2022 : उद्धव ठाकरेंच्या भाषणाला गृहमंत्र्यांची लगाम, कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करा अन्यथा....

करिअरसाठी इंग्रजी गरजेची नाही

करिअरसाठी इंग्रजी भाषा गरजेची आहे अशी अफवा पसरवण्यात आली असे भागवत म्हणाले, तसेच नव्या शिक्षणधोरणावर सध्या चर्चा सुरू आहे, परंतु आपण आपल्या मुलांना आपण मातृभाषेत शिक्षण देतो का ?  जर असे होत नसेल तर त्यामुळे आपली मातृभाषा कमकुवत होईल. रोजगाराचा अर्थ फक्त नोकरी किंवा सरकारी नोकरी नाही. कुठल्याही समाजात सरकार आणि खासगी अशा 10,20 किंवा 30 टक्के नोकर्‍या असतात. बाकी सगळ्यांना आपापली कामे करावी लागतात. यासाठी समाजाने नोकरीच्या मागे धावण्याऐवजी उद्योजक घडवावे असे आवाहनही भागवत यांनी केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी