Gram Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला कौल, 259 जागांवर भाजपचे सरपंच

नागपूर
Updated Sep 19, 2022 | 17:38 IST

Gram Panchayat Election Result 2022: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. 

दिलीप कांबळे, प्रतिनिधी : 

Maharashtra gram panchayat election: राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यापैकी 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या तर इतर 547 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीची आज मतमोजणी झाली आणि यामध्ये भाजपने बाजी मारल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. (Maharashtra Gram Panchayat Election result 2022 bjp claim 259 sarpanch elect watch video)

निवडणुकीचे निकाल समोर आल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं, महाविकास आघाडी सरकारची ऑटो पंचर झाली असून शिंदे फडणवीस सरकारची बुलेट ट्रेन सुसाट निघाली. जनतेतून सरपंच निवडणुकीच्या निकालाला जनतेने कौल दिला आहे. 

581 जागांचे निकाल आले असून त्यापैकी 259 भाजपप्रणित गटाचे सरपंच निवडून आले आहेत. तर शिंदे गटाचे 40 सरपंच निवडून आले आहेत. 299 जागांवर युतीचे सरपंच निवडून आले आहेत. सरकारने जनतेमधून सरपंचचा निर्णय घेतला त्या निर्णयाचा जनतेने स्वागत केले. त्यामुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक संख्यने शिंदे- फडणवीस गटाला निवडून दिले. महाविकास आघाडी सरकारने घोळ थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णयाला रद्द केला होता. आम्ही त्यांचा निर्णय दुरुस्त केला. प्रभाग पद्धतीचा गोंधळ महाविकास आघाडी सरकारने केला आहे अशीही टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी