कडक सॅल्यूट ! रजेवर असलेल्या जवानाने जीवाची पर्वा न करता वाचवले प्रवाशांचे प्राण

नागपूर
Updated Jul 10, 2022 | 14:20 IST

Maharashtra Rain updates: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याचं पहायला मिळत आहे. 

चंद्रपूर : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस कोसळत आहे. याच मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अशा मुसळधार पावसात (heavy rainfall) चंद्रपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिह्यातील टाकळी गावातील (Takali Village Chandrapur) नाल्यात पुल ओलांडताना पानवडाळ्याकडे जाणारा ऑटो पाण्याचा प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्या ऑटोमध्ये पाच प्रवाशी होते. वेळीच लष्करी जवानाने मदतीसाठी धाव घेत त्या प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. 

मृत्यूला समीप बघून ऑटोमधील नागरिक मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. मात्र पाण्याचा प्रवाह खूप जोरदार असल्याने कुणीही त्यांना वाचविण्यासाठी हिंमत केली नाही. अशात परिस्थितीत महिन्याभराच्या सुट्टीवर गावाकडे आलेले आर्मीचे जवान निखिल सुधाकर काळे यांनी थेट पाण्यात उडी घेतली. आपला जीव धोक्यात टाकून या जवानाने पाच लोकांचा जीव वाचविला. देशासाठी सिमेवर लढणाऱ्या या जवानाने रजेवर असतांनाही आपले कर्तव बजावले. ही संपूर्ण घटना नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून या जवानावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी