Chandrapur Flood | शॉर्टकट पडला महागात; प्रवासी बस पुराच्या पाण्यात अडकली, प्रवाशांच्या सुटकेचा थरारक LIVE VIDEO

नागपूर
Updated Jul 13, 2022 | 13:36 IST

Chandrapur passenger bus stuck in flood: चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. याच पुराच्या पाण्यात एक प्रवासी बस अडकली. 

चंद्रपूर : मध्यप्रदेशातून शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स बस पुराच्या पाण्यात अडकली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वात अंधारातच बचाव आणि मदतकार्य सुरु केले. स्थानिकांच्या मदतीने प्रचंड प्रवाहात देखील दोऱ्या बांधून पुरुष, वृद्ध, लहान मुले आणि महिलांना सुखरूप बाहेर काढले. (Passenger bus stuck in Chandrapur flood, watch live video of rescue operation)

त्यानंतर या प्रवाशांना दुसऱ्या एका बसमध्ये बसवून हैदराबादकडे रवाना केले. बस पुराच्या पाण्यात अजूनही अडकून पडली आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्यातील पथकाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचे प्राण वाचवीत धाडसाची कामगिरी केली. चिंचोली नाला येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मध्यपदेशातून निघालेली ही ट्रॅव्हल्स बस शॉर्टकट म्हणून राजुरा तालुक्यातील चिंचोली मार्गे हैदराबादला जात होती. पोलीस पथकाने पुढे मार्ग बंद आहे हे सांगितल्यावरही बस चालकाने बस  पुढे नेली. सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुराच्या पाण्यात बस बंद पडून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी