कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या, एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा: बच्चू कडू

नागपूर
Updated Oct 30, 2022 | 20:14 IST

AMRAVATI: कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या आहेत एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. असं वक्तव्य आमदार बच्चू कडूंनी केलंय.

Bacchu Kadu: अमरावती: रवी राणा व बच्चू कडू वाद हा शिगेला पोहचला असताना आज या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. मात्र, आता बच्चू कडू यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच आपण आजच मुंबईला निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (mla bacchu kadu once again makes a sensational claim about mla ravi rana criticism)

यावेळी दोघांची वेगवेगळी बैठक होणार की एकत्र होणार याच्याबद्दल अद्याप माहिती नाही. मात्र, कार्यकर्त्यांच्या भावना आरपारच्या आहेत एकदाचं काय ते तोडफोड करून बाहेर पडा असे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

'मात्र, राणा अत्यंत नीच पद्धतीने बोलला आहे मला असं वाटते आता त्यांनी व्यवस्थित जर अभिप्राय दिला तर ठीक. त्याने जे काही आरोप केले त्या संदर्भात त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा समाधान झाले तर एक तारखेचा विचार करू आणि जे बदनामी केली आहे ती वापस घ्यावी. म्हणजे विषय संपला.' अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी