मराठी महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला 'वटपौर्णिमा' साजरी केली जाते. खरंतर हे तीन रात्रीचे व्रत आहे. शुद्ध त्रयोदशीपासून याची सुरुवात होते. या वटसावित्री पूजनाच्या निमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील कळमगव्हाण येथे महिलांसमवेत पूजन केले आहे. राजकीय कारकीर्दीसोबत वटसावित्रीचे पूजन करून आपली संस्कृती जोपासली आहे. यावेळी कळमगाव येथील खासदार निधीमधून दहा लक्ष रुपयाच्या रोडचे भूमिपूजन देखील केले आहेत.