Nagpur Crime: ATM मध्ये छेडछाड करुन लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

नागपूर
Updated Sep 28, 2022 | 19:28 IST

Nagpur Crime News: नागपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन लाखो रुपये लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. 

Nagpur News: नागपूर शहरातल्या जवळपास 30 ATM मधून तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये लुटणाऱ्या एका रॅकेटचा छडा लावण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे. मध्यप्रदेशमधील तीन आरोपी राहुल सरोज, संजय पाल आणि अशोक पाल असे तीन आरोपींची नावे आहेत. हे तिन्ही आरोपी एटीएम मशीनमध्ये स्क्रू ड्रायव्हरच्या माध्यमातून त्यातील ट्रे काढत असे. नोट्स ज्या ठिकाणाहून बाहेर येतात तो नॉब बंद करून ठेवत असे. यामुळे जेव्हा कोणी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये यायचे तेव्हा पैसे ट्रेमध्ये अडकले असायचे. आरोपी नंतर येऊन स्क्रू ड्रायव्हरने हा ट्रे उघडून पैसे लुटून न्यायचे. (Nagpur police arrested a gang who theft lakh of rupees by manipulating atm machine)

एकट्या नागपूर शहरात या आरोपींनी 30 एटीएममध्ये अशाप्रकारे लूट केल्याचं तपासात उघड झालेले आहे. गेल्या काही महिन्यात या आरोपींनी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पुणे, ठाणे, अहमदाबाद आणि मध्यप्रदेशच्या कटनीमध्ये अनेक एटीएममध्ये अशीच लूट केली असल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. 

या आरोपींनी युट्युब वर काही व्हिडिओ पाहून अशा प्रकारे एटीएममधून चोरी केली जाऊ शकते याचा अभ्यास केला होता. नागपूरच्या सहा पोलीस स्टेशनमध्ये या गॅंगच्या विरुद्ध विविध बँकांनी गुन्हे दाखल केले आहे. देशभरात या लोकांनी किती एटीएममधून अशा प्रकारे किती रक्कम लुटली याचा तपास सध्या नागपूर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी